पनीर पराठा (paneer paratha recipe in marathi)

Adv Kirti Sonavane
Adv Kirti Sonavane @cook_32421729

सकाळी काय नाश्ता बनवू हा प्रश्न पडला .घाई ही खूप झाली होती .तेव्हा अचानक नजर फ्रिज मधल्या पनीर वर पडली .आणि झटकिपट पनीर पराठा बनवण्याची कल्पना आली .तीच रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करत आहे .

पनीर पराठा (paneer paratha recipe in marathi)

सकाळी काय नाश्ता बनवू हा प्रश्न पडला .घाई ही खूप झाली होती .तेव्हा अचानक नजर फ्रिज मधल्या पनीर वर पडली .आणि झटकिपट पनीर पराठा बनवण्याची कल्पना आली .तीच रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करत आहे .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
1 व्यक्तीसाठी
  1. भिजवलेले कव्हाचे कणीक
  2. 1 वाटीपनीर
  3. 1हिरवी मिरची
  4. 1 बारीक चिरलेला कांदा
  5. बारीक चिरलेली कोथिंबीर
  6. 1/2 चमचालाल तिखट
  7. 1/2 चमचाधणे जीरे पूड
  8. 1/2 चमचा जीरे
  9. 1/2 चमचालसूण अदरक पेस्ट
  10. आवडीनुसार मीठ
  11. तूप

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    गव्हाचे पीठ घट्टसर मळून घ्यावे. पनीर मधील सर्व पाणी हाताने निथळून घ्यावे. व त्याला वाटी मध्ये कुस्करून घ्यावे.

  2. 2

    त्यानंतर सर्व जिन्नस पनीर मध्ये टाकून चांगले मिक्स करावे. व गॅस वर तवा गरम करण्यासाठी ठेवावा.

  3. 3

    त्यानंतर कणकेचा गोळा घ्यावा व त्यामध्ये पुरण भरतो तसे हे मिश्रण भरावे.तुम्हाला लाटायला अवघड वाटत असेल तर मिश्रण थोडे कमी भरावे. व त्यावरती थोड सुक पीठ लावावे.म्हणजे लाटताना त्रास होत नाही.

  4. 4

    हे मिश्रण व्यवस्थित आतमध्ये भरून झाल्यावर पोळपाटावर हाताने हलक्या हाताने थापून घ्यावे.जेणेकरून आतील पनीर चे मिश्रण सर्व बाजूने व्यवस्थित लागले जाईल. व नंतर लाटण्याने त्याच्या कडा हलक्या हाताने लाटून घ्याव्या.

  5. 5

    यानंतर गरम तव्यावर थोड तूप लावून हा पराठा खरपूस भाजून घ्यावा.भाजताना वरतून हलक्या हाताने दाबायचा.जेणेकरून व्यवस्थित भाजला जातो.

  6. 6

    आपला झटकिपट पनीर पराठा तयार आहे.काही नाही तर तुम्ही चहा सोबत नाहीतर टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता.खूप कमी वेळात आणि अगदी चविष्ट होतो.एकदा नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Adv Kirti Sonavane
Adv Kirti Sonavane @cook_32421729
रोजी
नवीन पदार्थ बनवायला आवडतात .पण या प्लॅटफॉर्म मूळे तुमच्या पर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली . त्यासाठी cook pad चे मनापासून आभार
पुढे वाचा

Similar Recipes