खजूर केक (शुगर फ्री) (Khajur Cake Recipe In Marathi)

खजूर केक (शुगर फ्री) (Khajur Cake Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सगळ्यांची तयारी करावी बारीक रवा आणि मैदा घ्यावा. सीडलेस खजूर एका बाऊलमध्ये काढावे आणि त्यामध्ये दूध घालून 30 मिनिटे भिजत ठेवावे.
- 2
त्यानंतर रवा आणि मैदा मिक्स करावा त्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालावा. त्यानंतर भिजत ठेवलेला खजूर मिक्सर मध्ये घालून त्याची पेस्ट करावी. त्यानंतर ड्रायफूट काढून ठेवावे. काजू आणि बदामाचे बारीक तुकडे करावे. 2-3 खजूर चे तुकडे बाजूला ठेवावे डेकोरेशन साठी.
- 3
त्यानंतर रवा आणि मैद्याच्या मिश्रणामध्ये खजूर ची पेस्ट घालावी त्यानंतर गुळ आणि खारीक पावडर घालावी त्याचबरोबर ड्रायफूट चे तुकडे घालावे. तेल घालावे. आता थोडे थोडे दूध लागेल इतके घालून मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे.
- 4
केकचे मिश्रण आता आपले चांगले मिक्स झाले. आता केकच्या भांड्याला थोडेसे तेल लावून त्यावर मैदा सर्व बाजूंनी घालावा. त्यानंतर केकचे मिश्रण त्यामध्ये घालावे. आता डेकोरेशन साठी बाजूला ठेवलेले दोन-तीन खजूर यांचे बारीक तुकडे करून केक वर सर्व बाजूने घालावे.
- 5
कुकर मध्ये तळाशी मीठ घालावे सर्व बाजूने आणि कुकर 5-7 मिनिटे आधी गरम करून घ्यावा. त्यानंतर एक रिंग किंवा स्टॅन्ड ठेवून त्यावर केकचे मिश्रण चे भांडे ठेवावे. कुकरची रिंग आणि शिट्टी काढून कुकरचे झाकण लावावे. गॅस मध्यम ठेवावा. साधारण 25-30 मिनिटे लागतात केक तयार व्हायला. झाकण उघडून बघावे की आपला केक तयार झाला आहे का.
आता आपला केक तयार झाला आणि बाहेर काढावा. - 6
आता थोडासा गार झाल्यावर की एका प्लेट मध्ये काढावा आणि कट करून सर्व्ह करावा.
Keywords
Similar Recipes
More Recipes





















टिप्पण्या