वांग्याचे कच्चे भरीत (Vangyache Kache Bharit Recipe In Marathi)

#GR2 ..गावरान रेसिपी निमित्ताने केलेले, आवडीचे वांग्याचे कच्चे भरीत..
ग्रामीण भागात चुलीमध्ये भाजलेल्या वांग्याच्या भरीताची चव वेगळीच.. आणि त्यातही हे वांग्याचे भरीत फोडणी न देता कच्चेच, पातीचा कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो इत्यादी कमीत कमी सामग्री टाकून... झटपट होणारे.. गरमागरम भाकरी सोबत मस्त लागते.. तेव्हा बघूया हे गॅसवर भाजलेल्या वांग्याचे कच्चे भरीत..

कुकिंग सूचना
- 1
वांगी स्वच्छ धुऊन घ्यावे. माझ्याकडे एकच मोठे वांगे होते. त्याच्यामुळे मी एकच घेतले आहेत. आणि त्याला चार-पाच उभ्या चिरा द्याव्या. प्रत्येक चीरीमध्ये सोललेली एक एक लसणाची पाकळी टाकावी.
- 2
आता गॅसवर एक जाळी ठेवून त्यावर वांगी चांगले भाजून घ्यावे.
- 3
भाजलेले वांगे थंड होऊ द्यावे त्यानंतर त्याला सोलून घ्यावे आणि मॅश करून घ्यावे.
- 4
पातीचा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची बारीक चिरून घ्यावी.
- 5
आता मॅश केलेले वांगे एका बाऊलमध्ये घ्यावे. त्यात हिरवी मिरची, चिरलेला पातीचा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकावी. तिखट, मीठ आणि भाजलेली जिरेपूड टाकावी.
- 6
हे चांगले मिक्स करून घ्यावे. आपल्याला चालत असेल तर हे वांग्याचे भरीत तसेच खावे. मी त्याला वरून तडका दिलेला आहे. त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यावर त्यात जीरे, मोहरी, कढीपत्ता आणि हळद टाकावी.
- 7
हा गरम तडका भरिता मध्ये ओतावा आणि मिक्स करून घ्यावे.
- 8
मस्त झटपट तयार होणारे कच्चे वांग्याचे भरीत तयार आहे. ग्रामीण भागामध्ये फोडणी न देता अशा प्रकारे चे कच्चे भरीत बऱ्याचदा केले जाते आणि चवीला सुद्धा छान लागते.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या