एग मसाला राईस

Darpana Bhatte @cook_19543746
फोडणीच्या भाताला एक नविन ऑप्शन
#lockdown, #stayathome,
#workfromhome,#let'scook
कुकिंग सूचना
- 1
कांदा, टोमॅटो, सिमला मिरची बारीक चिरावेत. कढईत तेल गरम करून त्यात हिंग घालून कांदा घालावा. कांदा थोडा मऊ झाल्यावर त्यात आले-लसूण पेस्ट घालून खमंग वास येईपर्यंत परतावे.
- 2
परतलेल्या कांद्यात सगळे मसाले घालून परतावे. सर्व एकजीव झाल्यावर त्यात टोमॅटो व सिमला मिरची घालून झाकण ठेवून थोडे शिजवून घ्यावे. अंडी फोडून त्यात चिमूटभर मीठ घालून फेसून घ्यावे.
- 3
टोमॅटो व सिमला मिरची शिजल्यावर त्यात फेसलेले अंडे घालून मिश्रण एकजीव करावे.
- 4
तयार मिश्रणात शिजवलेला भात घालून एकत्र करावे. झाकण ठेवून दोन मिनिटे शिजू द्यावे. अंडे भातात शिजल्यावर वरून कोथिंबीर घालून गरमच खायला द्यावा, ' मसाला एग राईस'.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11921166



टिप्पण्या