कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दाढ्याच्या खाऱ्याचं सुकं (fish recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दाढ्याच्या खाऱ्याचं सुकं (fish recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दाढ्याच्या खाऱ्याचं सुकं (fish recipe in marathi)

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319

#रेसिपीबुक

दाढ्याच्या खाऱ्याचं सुकं हा पदार्थ मी सासरी आल्यावर पहिल्यांदा खाल्ला.माझ्या साबांचं माहेर डहाणू.एकदा तिथून येताना त्या सुके मासे घेऊन आल्या,त्यात होतं दाढ्याचं खारं.

दाढा म्हणजे मोठ्ठा रावस.जवळजवळ चर साडेचार फुटाचा.दुर्मिळ मासा,जो या विरार ते डहाणू आणि पुढे दमणपर्यँतच मिळू शकतो. याला मीठ लावून उन्हात सुकवले जाते.यात अजून एक प्रकार असतो,तो म्हणजे ओलं खारं. ओलं खारं म्हणजे अगदी एक दिवस सुकलेलं खारं. तेही खूप चविष लागतं.

पण हा मासा दुर्मिळ असल्याने सर्वसाधारण पणे बाजारात विकत मिळत नाही त्यामुळे सहजपणे मिळणेही कठीण असते.भेट देण्यासाठीच हा मत्स्यविशेष वापरला जातो बहुधा. त्यामुळे प्रेमाची भेट म्हणून मिळालेल्या या माशाची चव आगळीच असते.मला कधी आमची चिंबईकर मावशी ही भेट देते तर कधी माझा भाचा शिरीष भोसले याला माझी आवड समजल्यावर, आपल्या मित्राला सांगून, मिळवून देतो.

पण आज मी तुम्हाला सांगणार आहे ती सुकलेल्या दाढ्याच्या सुक्याची अतिचविष्ट पाककृती. गोडं वरण भात किंवा आंबट वरण भात किंवा तांदळाची भाकरीआणि हे सुकं असलं की मेजवानीच.पण करायचं मात्र लोखंडी कधी किंवा तव्यात,आणि मंद आचेवरच,ही माझी खास अनुभविक टिप्पणी.असं काही खरपूस होतं ना हे सुकं.बस्स रे बस्स!

लिहिता लिहिता आठवणीनेही पाणी सुटलं तोंडात. देते लगेचच पाककृती.तुम्हाला कधी हा मत्स्यविशेष मिळाला तर जरूर करून पहा.

यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मुख्यतः दाढ्याचं खारंच,बाकी तर घरातलेच जिन्नस असतात.मिळालं तुम्हाला तर मलाही भेट द्या, मित्रांनो.

घ्या साहित्य जमवायला.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
चार
  1. १५/२० छोटे तुकडे,एक इंचचे.दाढ्याच्या खाऱ्याचे
  2. 4मध्यम कांदे,बारीक चिरून
  3. 25लसूणपाकळ्या
  4. 30 ग्रॅमचिरलेली कोथिंबीर
  5. 50 ग्रॅमतेल
  6. 10 ग्रॅमलाल मिरचीपूड
  7. 5 ग्रॅमहळदपूड
  8. 5 ग्रॅमगरम मसालापूड
  9. 3कोकमे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    तुकड्याची खवले काढून टाकून, पाण्यात तासभर भिजवा.नन्तर स्वच्छ पाण्याने धुवून,निथळून घ्या.

    दाढ्याच्या खाऱ्याचं सुकं (fish recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत तेल तापवून लसूणपाकळ्या ठेचून घाला.लालसर होऊद्या.

    दाढ्याच्या खाऱ्याचं सुकं (fish recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    त्यावर दाढ्याच्या खाऱ्याचे तुकडे टाकून परतून घ्या.लाल मिरचीपूड, हळदपूड, कोकमे तुकडे करून,घाला व परता.

    दाढ्याच्या खाऱ्याचं सुकं (fish recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    कांदा घालून व्यवस्थित परता.वर पाण्याचे झाकण ठेवून मंद आचेवर पाच मिनिटे शिजवा.

    दाढ्याच्या खाऱ्याचं सुकं (fish recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    कांदा घालून व्यवस्थित परता.वर पाण्याचे झाकण ठेवून मंद आचेवर पाच मिनिटे शिजवा.

    दाढ्याच्या खाऱ्याचं सुकं (fish recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता झाकण न ठेवता शिजवा.आच मंदच असू द्या.मध्ये परतत शिजवा.कांदा पूर्ण शिजला की तेल सुटू लागेल,तेव्हा गरम मसाला पूड आणि कोथिंबीर घालून परता.
    आच बंद करा,थोडा वेळ तसेच गॅसवर राहुद्या. यात मीठ घालायची गरज नाही.

    दाढ्याच्या खाऱ्याचं सुकं (fish recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    गरमगरम वाफाळता गोडं वरण भात, आंबट वरण भात किंवा तांदळाच्या भाकरीसोबत आस्वाद घ्या.माझी आवड तांदळाची भाकरी.

    दाढ्याच्या खाऱ्याचं सुकं (fish recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

नूतन सावंत
नूतन सावंत @cook_20864319
28 जून 2020 17:41 रोजी

टिप्पण्या

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
29 जून 2020 06:48
😋👌👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खाज्याचे कानवले (khajyache kanvale recipe in marathi)
  2. उपवास स्पेशल राजगिरा शिरा (rajgiryacha shira recipe in marathi)
  3. चिकन कलेजी फ्राय (chicken kaleji fry recipe in marathi)
  4. डाळीची खिरापत (dalichi khirapat recipe in marathi)
  5. पालक भजी (palak bhaji recipe in marathi)
  1. सातारी तडका मिसळ (misal recipe in marathi)
  2. भाजक्या पोह्यांचा चिवडा (poha chivada recipe in marathi)
  3. व्हाईट सीक्रेट (cake recipe in marathi)
  4. आरोग्यवर्धक काढा (kadha recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13026239
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close