व्हाईट सीक्रेट (cake recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

फूट फोटोग्राफीचा सध्या ऑनलाईन आपले वर्कशॉप सुरू झालेले आहे, त्यामध्ये खूप छान मॅडमनी आयडियाज दिल्या,,
त्यासाठी होमवर्क म्हणून मी हा केक केलेला आहे,
प्रयत्न केला की फोटोग्राफी चांगली यावी,
तस ही मला केक करायला अतिशय आवडतो,
मी कुठे काही शिकलेली नाहीये पण आवड आहे आयसिंग केक करण्याची,,,
आणि हा केक अतिशय हेल्दी झालेला आहे या केक मध्ये ज्वारी बाजरीचे पीठ घातल्यामुळे हा जास्त हेल्दी झालेला आहे ,,
आणि भरपूर प्रमाणात याच्यामध्ये फायबर आहे कारण त्यामध्ये मनुका आणि किष मिष् घातल्याने तो फायबरयुक्त झालेला आहे,,
आणि कदाचित तुम्हाला असं वाटू शकते की ज्वारी बाजरी चे पीठ घातल्याने हा केक चवीला खराब लागेल,,,
पण माझ्यावर विश्वास ठेवा, असे अजिबात नाही,,
केक अतिशय चवीला सुंदर झालेला आहे करून बघा तुम्ही हा प्रयोग,,
तुम्हालाही आवडेल हा केक आणि तुमच्या मुलांना पण आवडेल.
फक्त मुलांना सांगू नका यात ज्वारी बाजरी चे पिठ घातले आहे म्हणून,,
मी हा प्रयोग याच्यासाठी केला की नेहमी नेहमी मैदा खाणं चांगलं नाही,,
माझ्या मुलांना पण वेग वेगळे केक हा फार आवडतात,, म्हणून असे करून बघितलं की जेणेकरून ते हेल्दी खाऊ शकतील थोडेफार,,
माझा स्वतःचा प्रयोग आहे हा, काहीतरी चांगलं करण्याचा...
तुम्हाला काहीतरी विचित्र वाटेल हे ,,
पण खरंच तुम्ही हा विचार करून बघा,
आणि एकदा करून बघा,,,
पण जर तुम्हाला आवडेल तर नक्की कळवा..
नाही आवडला तरीपण तुम्ही मला टीप द्या ♥️🌹

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 3/4 कपज्वारी बाजरीचे मिक्स पीठ
  2. 1/2 कपमैदा
  3. 1 टेबल स्पूनबेकिंग पावडर
  4. 1 टीस्पूनबेकिंग सोडा
  5. 1/4 कपकोकोनट ऑइल
  6. 1 कपवीप क्रीम
  7. 3/4 कपपिठी साखर
  8. 1/2 कपदूध
  9. 10किष मिश
  10. 10मनुका
  11. 1/2 टीस्पूनविलायची पावडर
  12. 1/2जायफळ पावडर
  13. 1/4 कपमिल्क पावडर
  14. 1/2 कपखोबरा कीस
  15. 1/4 कपकोको पावडर
  16. 1 टीस्पूनकेक स्प्रिंकल

कुकिंग सूचना

45 मि
  1. 1

    ज्वारी बाजरीचे पीठ आणि मैदा, मिल्क पावडर हे गाळून घ्यावे, त्यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हे पण गाळून घ्यायचे,, मनुका आणि किष्मिष हे सहा सात तास आधी भिजत घालायचे,, किसमिस मनुका हे ऑप्शनल आहे तुम्हाला जो मेवा घालायचा, तो घालू शकता,,

  2. 2

    मनुका किस्मिस हे मिक्सर मधून जाडसर बारीक करून घ्यावे,,, एका पातेल्यामध्ये ऑइल पिठीसाखर आणि दूध हे मिक्स करून घ्यावे,, त्यामध्ये मिक्‍सरमधून काढलेले किस मिश, मनुका घालून द्यायचा..

  3. 3

    आता या पातळ बॅटरमध्ये खोबरा कीस, जायफळ पावडर विलायची पावडर घालून मिक्स करायचे,,

  4. 4

    आता या बॅटरमध्ये आपल्याला ज्वारी-बाजरी मैदा हे पीठ मिक्स करायचे आहे,, जास्त घट्ट झालं तर थोडेसे दूध ऍड करू शकता,,

  5. 5

    आता एका दुसऱ्या पातेल्यामध्ये कोको पावडर घ्यायचे त्यामध्ये आपण तयार केलेल्या केकचे बॅटल अर्धे घालून द्यायचे आणि मिक्स करायचे,,

  6. 6

    केक टीन ला ग्रीस करून घेणे,, आता त्यामध्ये मनाप्रमाणे दोन्ही बॅटल वेगवेगळ्या तऱ्हेने घालून घ्यावे,, मार्बल टाईप त्याला डिझाईन देणे,,

  7. 7

    आता केक बेक करण्यास कनेक्शन मोडवर वन सिक्सटी डिग्री वर तीस मिनिटासाठी केक बेक करण्यास ठेवावा,,

  8. 8

    आता आपल्या केक तयार झालेला आहे त्याला गार करून घेणे, त्यानंतर विप क्रीम ला बीट करून घेणे बिटर च्या साह्याने,, ते थंड झाल्यावर विपिन क्रीम ने केक ला क्रम कोट करून घ्यावे,, त्यानंतर पायपिंग बॅग ला आवडीप्रमाणे नोजल लावून त्याच्यावर मनाप्रमाणे डिझाईन तयार करायचे,, जमल्यास त्यावर स्प्रिंकल वेगवेगळ्या आकाराचे लावू शकता,

  9. 9

    आता आपला वाईट सिक्रेट केक तयार आहे, हा केक खूप जास्त पौष्टिक आहे, यामध्ये मी ज्वारी बाजरीचे पीठ युज केलेले आहे, त्यामुळे तो जास्त हेल्दी झालेला आहे,,आणि चवीमध्ये इतकाच काही फरक वाटत नाही,, खूप सुंदर हा केक चवीला लागतो, फक्त मुलांना सांगू नका की कसला केक बनवलेला आहे नाहीतर ते खाणार नाहीत,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

Similar Recipes