शेवळाची खिमा घालून भाजी (shewale kheema bhaji recipe in marathi)

#रेसिपीबुक #week5
पहिला पाऊस पडला की,एखाद्या आठवड्यात बाजारात शेवळं दिसू लागतात.त्यासोबत काकडंही. मातकट,किरमिजी रंगांच्या साधारण सात ते आठ इंची कोंब, जणू एखाद्या फुलाच्या कळ्याच जणू.एखादीतून तिचा पिवळसर कोंब,एखादीतून चक्क जांभळा कोंब दिसतोय.
साधारण आठवडाभरच निसर्गाचे हे नवल पाहायला मिळते आणि पुढची आठ/दहा दिवसात अंतर्धानही पावते. एरवी भाजीच्या तजेलदार रंगरुपाबाद्द्ल चोखंदळ असणारी मी या मातकट,किरमिजी भाजीच्या दर्शनाने खूष होते.
या भाजीसोबत काकडंही असतात. ही काकडं म्हणजे पण निसर्गाची एक कामालच.या खाजऱ्या भाजीच्या वेळी ही फळं तयार झालेली असतात. डोंगरी आवळ्याची लहान आवृत्ती जशी दिसेल तशीच हिरवट पोपटी दिसतात.पण बिया मात्र गोल असतात.आवळ्यारख्या कंगोरेदार नसतात.पण चवही तशीच लागते.पण मी चिंच वापरते.
या भाजीची पण गम्मतच आहे.शाकाहारी जितकी छान लागते तितकीच मांसाहारीही. खिमा घालून करा;कोलंबी घालून करा;सोडे घालून करा;करंदी घालून करा’किंवा हरभरा डाळीचा भरडा घालून करा;वालाचे किंवा मुगाचे बिरडे घालून करा, ती मस्तच लागणार. तुम्ही ती कशीही करा.पण आता मात्र मी मटणखिमा घालून ही भाजी करतेय.
(कोलंबी वापरल्यास लहान आकाराचीच वापरावी.फार मोठी नको.सोडे वापरल्यास तासभर भिजवून लहान तुकडे करून वापरावेत.भरडा किंवा वाल वापरल्यास अर्धी वाटी भरडा भिजवून वापरा.तो भिजून दुप्पट होतो.वालाचे किंवा मुगाचे बिरडे मात्र जेवढयास तेवढे घ्यावे.)
थोडे श्रम घ्यावे लागतात या भाजीसाठी पण ते सार्थकी लागतात हे मात्र अगदी खरं.
घ्या तर साहित्य जमवायला.

कुकिंग सूचना
- 1
फोटोत दिसणारा मधला कोंब काढून त्याच्या खालच्या भागावर दिसणारा जर्द पिवळा किंवा कधी केसरी,कधी लालसर भाग आणि त्यावर असणारा क्वचित् खसाखशीसारखे दाणे असणारा पांढरा भाग काढून उरलेला भाग घ्यायचा पाण्यात घालून स्वच्छ धुऊन घेते.अतिशय बारीक चिरून भाजी पुन्हा चाळणीत घालून धुवून घ्या.रात्रभर पाण्यात कोकम आगळ घालून त्यात भाजी बुडवून ठेवा.याने बहुतेक खाजरेपणा कमी होतो.
- 2
दुसऱ्या दिवशी सकाळी निथळून घेऊन कढईत.दोन तीन पळ्या तेल घालून त्यात भाजी टाकून परता. चर्र.....चर्र आवाज येतच असतो,हा आवाज बंद होत नाही तोपर्यंत भाजी ढवळणे सोडायचे नाही.जेव्हा हा आवाज बंद होईल तेव्हा परतणे थांबवा.या स्टेजला तुम्ही भाजी हवाबन्द डब्यात ठेऊन फ्रीजरमध्ये ठेवून वर्षभरात कधीही वापरू शकता.
- 3
खिमा धुऊन,निथळून त्याला आले + लसूण + मिरची + पुदिना + कोथिंबिरीचे वाटण चोळाआणि तासभर मुरू द्या.
- 4
जाड कापलेला कांदा थोड्या तेलावर भाजून घ्या.त्यातच खोबरे टाकून भाजा.हे दोन्ही भाजले की मध्ये थोडी जागा करून थोडे तेल टाकून तमालपत्र वगळता सगळा खडामसाला मसाला घाला आच मंद जरून दिन मिनिटे परता हिरव्या मिरच्या व अर्धी कोथिंबीर घालून त्यावर कांदा खोबऱ्याचं आच्छादन करून गॅस बंद करा.थंड झाले की मिक्सरमधून मुलायम वातुन घ्या.
- 5
कढईत तेल तापवाून तमालपत्र घाला आणि चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परता.
- 6
खिमा घालून परता.खिम्याचा रंग बदलला की दोन वाट्या गरम पाणी घालून,झाकण ठेवून द्या.
- 7
खिमा शिजला की परतलेली भाजी घाला.वाटण घाल मिक्सर धुऊन मसाल्याचे पाणी घालावे.लागल्यास अजून थोडे गरम पाणी घाला.संडे मसाला व हळदपूड घाला.
- 8
चिंचेचा कळ,कोथिंबीरआणि मीठ घालून,दोन चार उकळी घेऊन गॅस बंद करा. अंगासरसा रस ठेवा.वर काथिंबीर पेरून सादर करा.
- 9
वडे किंवा पुरी, आंबोळ्या,चपाती,भाकरी(तांदूळ किंवा ज्वारी)सोबत वाढा. खरंतर या भाजीची नाजुकता पाहिली तर वडे किंवा पुरीच हवी,पण माझी आवड भाकरी.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या