अळुवडी (aloo wadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week5
पावसाळी गंमत
बाहेर पाऊस चालू असला की काहीतरी गरमागरम, चटपटीत खावेसे वाटते. कुरकुरीत अळूवडी त्यातलाच एक प्रकार. अळूची पाने २ प्रकारची असतात. एक वड्यांची आणि एक भाजीची, वड्यांची पाने वड्यांना वापरली तर घशात कापत नाहीत मग चिंच गूळ नाही टाकले तरी वड्या छान होतात.
अळुवडी (aloo wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5
पावसाळी गंमत
बाहेर पाऊस चालू असला की काहीतरी गरमागरम, चटपटीत खावेसे वाटते. कुरकुरीत अळूवडी त्यातलाच एक प्रकार. अळूची पाने २ प्रकारची असतात. एक वड्यांची आणि एक भाजीची, वड्यांची पाने वड्यांना वापरली तर घशात कापत नाहीत मग चिंच गूळ नाही टाकले तरी वड्या छान होतात.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम अळूची पाने स्वच्छ धुऊन पुसून घ्यावीत. बेसन पीठात लाल तिखट, मीठ, हळद, तीळ मिक्स करुन घ्यावे. मग त्यात पाणी घालून बॅटर बनवावे.
- 2
पोळपाटावर किंवा सपाट ताटावर अळूचे पान उलटे ठेऊन बॅटर पानावर लावून त्याच्या वर दूसरे पान ठेऊन बॅटर लावून, अशी ४-५ लावावीत.पाने दोन्ही बाजूने दुमडून त्याचा रोल करून घ्यावा
- 3
एका टोपात एक ग्लास पाणी व लिंबाची फोड टाकून त्यावर रोल १५ मिनिटे मीडियम गॅसवर उकडून घ्यावे. मग त्याचे काप करून
तळून घ्यावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अळुवडी (aloo wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5अळुवडी ही महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये खूप प्रसिद्ध आहे.पावसाचा एकच जोरदार शिडकावा झाला की घराच्या आवारात-शिवारात अळुचं बनच्या बन लसलसायला लागतं. सुरुवातीला लहानुली असलेली पानं थोड्याच दिवसात हाताच्या पशाला मागे टाकतात...!अळूची पाने दोन प्रकारची असतात. ज्या पानांचे दांडे आणि देठ काळपट रंगाचे असतात ती पाने अळुवडीसाठी वापरतात. भाजीचा अळू आणि वडीचा अळू अशी साधारण वर्गवारी केली जाते.खूप तंतुमय पदार्थ असल्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी किंवा मधुमेही लोकांसाठी अळू अतिशय उपयुक्त आहे. A, B6 आणि C जीवनसत्वे यामध्ये खूप प्रमाणात असतात.पावसाळ्यात पाऊस असो वा नसो कोकणातल्या जमिनी पाणथळ असल्यामुळे जमिनीतल्या पाण्यावर अळू वाढत राहातो. गणपतीला नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे. मी मालवणी पद्धतीच्या अळुवडीची रेसिपी शेअर करत आहे. नक्की ट्राय करा!!! Priyanka Sudesh -
अळूवडी (alu wadi recipe in marathi)
# कूकपॅड ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आजअळूवडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. श्रावण महिन्यात मिळनाऱ्या हिरव्या पालेभाज्या मधील अळूची भाजीची पाने तसेच अळूवडीची पाने मिळाली. माझ्याघरी सर्वांना अळूवडी खूप आवडते. Mrs. Sayali S. Sawant. -
झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi)
अळूवडी म्हटलं की सांग्रसंगित तयारी करावी लागते. त्याच बेसनाचं पुरण करायचं तर अगदी नारळ खवण्यापासून वाटण करण्यापर्यंत बरीच तयारी करावी लागते, त्यानंतर रोल करणं, वाफवून घेणं.., मग शॅलो किंवा डीप फ्राय करून घेणं ही सारीच कसरत. त्यात काही जणींना घट्ट रोल करणे फारसे जमत नाही मग तळताना तेलात वड्या उलगडून जातात. ही सगळी फजिती टाळण्यासाठी, आणि जर अळूची पाने कमी प्रमाणात उपलब्ध असतील तर... हा एक पर्याय.नक्की करून पहा झटपट अळूवडी विदाऊट रोल Minal Kudu -
अळूवडी (aloo wadi recipe in marathi)
#अळूवडी #अळुवडीचं नुसतं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटत. महाराष्ट्रीयन थाळी अळूवडी शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठी खाद्य संस्कृतीत अळुवडीला विशेष महत्व आहे. ही खमंग व रुचकर जिभेचेच चोचले पुरवतच नाही तर ती तितकीच तब्बेतीची निगा राखते तिच्या सेवनाने किडनी संबंधीचे आजार होत नाहीत. खमंग आणि रुचकर व तितकीच हेल्दी आणि गुणकारी अळूवडी कशी बनवायची ते पाहूया. Shama Mangale -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणून अळूवडीची ओळख आहे . जितकी ती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तितकीच गुजरात मध्ये पात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. अळूची पाने विशेतः पावसाळ्यात छान मिळतात आणि पावसाळी थंड वातावरणात ही कुरकुरीत खमंग अळूवडी ची मजा काही औरच Shital shete -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपबुक #week14अळूवडी आणि बर्फीअळूवडी ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनविली जाते, बेसन, चिंच गूळ, वाटण, घालून किंवा भिजलेली चणाडाळ, मुगडाळ वाटून बनविली जाते खमंग चटपटीत अशी ही अळूवडी सगळ्यांच्याच आवडीची असते तर पाहुयात अळूवडी ची पाककृती. Shilpa Wani -
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळूवडी हा बहुतेक सगळ्या मराठी लोकांचा आवडता पदार्थ आहे. वडीच्या अळूच्या पानांना पीठ सारवून उंडे वळून वाफवून घेतात. वाफवलेले उंड्यांच्या वड्या कापून तळतात किंवा तव्यावर तेल घालून भाजतात. ह्या वड्यांचे बारीक तुकडे करून खमंग फोडणीला टाकले आणि नारळ, कोथिंबीर घातली की छान चविष्ट भाजी सुद्धा होते. अळुवडीचं पीठ वेगवेगळ्या पद्धतीनं करतात. ही ब्राह्मणी पद्धतीची अळूवडी - भाजणी, चिंच, गूळ आणि गोडा मसाला घालून फारच चविष्ट लागते. Sudha Kunkalienkar -
अळूवडी रेसिपी (aloo vadi recipe in marathi)
#KS1श्रावण महिना म्हटलं की अळू वडी पानात नाही असे कोकणातील घर विरळाच. गणपतीतही गौरीच्या नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे.अळूची पाने दोन प्रकारची असतात. ज्या पानांचे दांडे आणि देठ काळपट रंगाचे असतात ती पाने अळुवडीसाठी वापरतात.चला पाहूयात अळूवडीची रेसिपी, nilam jadhav -
अळूच्या वड्या (aluchya vadya recipe in marathi)
#shr#श्रावण_स्पेशल #cooksnap_चॅलेंज#महाराष्ट्रीयन_रेसिपी#महाराष्ट्रयीन_रेसिपीदिप्ती हीची अळूवड्यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. अळूवड्या खूप छान टेस्टी झाल्या. श्रावण महिन्यात खूप छान छान सणांची रेलचेल असते. विविध प्रकारचे पदार्थ बनवायला खूप उत्साह असतो. सगळीकडे हिरवेगार निसर्ग सौंदर्य बघायला मिळाते. श्रावणात भरपूर हिरव्या गार भाज्या उपलब्ध असतात. यादिवसात अळूच्या वडीची आणि भाजीची हिरवीगार पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. खमंग कुरकुरीत अळूवड्या खायला मिळणे म्हणजे पर्वणीच असते.आळूवडीची पाने आणि अळूच्या भाजीची पाने यात फरक असतो. आळूवडीची देठं पानांच्या शेवटी असतात आणि भाजीची देठं पानांच्या शेवटाकडून दिड ते दोन इंच पुढे असतात, आणि ती चकचकीत पण असतात. वडी साठी पानांची देठ काढून पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. अळूची पानं धुताना हाताला खाज सुटते, म्हणून हाताला चिंच फासून मग पानं धुवायची. आमच्या कडे नैवेद्यासाठी अळूवड्या ठेवताना त्यामधे आलं लसूण घालत नाहीत. Ujwala Rangnekar -
आळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 आळूवडीआणिबर्फीरेसिपीpost1कुरकुरीत खमंग अळूवडी बहुधा लहान-थोर सर्वानाच आवडते. पूर्ण श्रावण आणि पावसाळ्यामधे अळूची पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. काळसर देठाची अळू ही अळूवडीसाठी वापरली जातात आणि साधारण हिरवट देठाची पाने अळूच्या भाजीसाठीवापरली जातात.तळताना अळूवडीच्या सुटत जाणा-या खमंग पदरासारख्या कितीतरी आठवणी ह्या एका मराठमोळ्या पदार्थांभोवती घुटमळतात. एकेका सुरेख आठवणींचे पदर हळूहळू उलगडत पार भुतकाळाची वारी घडवून आणतात. अळूवडीची पाने आता जरी सर्रास १२ महिने मिळत असली तरी पूर्वी जास्त करून पावसाळ्यात उपलब्धता असे. मस्त पावसाळ्यातील दिवस, हिरवाईच्या अनेक छटा ल्यालेली झाडे, धुंद वातावरण आणि खमंग शाकाहारी जेवणाचा बेत. गौरी-गणपतीत तर घरी हमखास अळूवडीचा बेत असतो. यात एक नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे अळूची पाने (Taro Leaf). अळूच्या पानांपासून बनवलेल्या अळूवड्या ह्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. पण तुम्हाला माहिती आहे औषधी गुणधर्म असलेल्या या अळूच्या पानांपासून न केवळ अळूवडी बनवता येते तर आणखी खमंग, चटकदार चवदार अशा रेसिपीज बनविता येतात.अळूची पाने खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात आणता येते. त्याचबरोबर पोटाचे विकार, सांधेदुखी यांसारखे आजारही बरे होण्यास मदत होते. त्यामुळे अळूची पाने खाताना जर तुमची नाकं मुरडत असतील तर तुम्ही ही आळूवडीची रेसिपीज ट्राय करुन त्यावर ताव मारू शकता. Nilan Raje -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी आज मी वेगळ्या पद्धतीने अळूवडी करून पाहिली. नेहमी पानांना पीठ लावून करते. त्यांना पानही जास्त लागतात. पण या पद्धतीने केल्यास पाने कमी लागतात.तुम्ही ही रेसिपी करून बघा. Sujata Gengaje -
अळुवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अळुची पाने बाजारात सहज मिळतात पण ज्या पानांच देठ काळसर दिसतं, त्या पानांनी घशात शक्यतो खवखवत नाही.तशी पान नाही मिळाली तरी ठीक आपण या वड्या करतांना दही घालणारच आहोत.अळु्च्या पानांचे प्रकार करतांना काहीतरी आंबट घालावे जसे दही,आमचुर,चिंच इ.हा एक पारंपारिक पदार्थ आहे. सणावारा मधे हमखास घरोघरी केला जातो. Amruta Parai -
अळुवडी रस्सा भाजी (aloo wadi rasa bhaji recipe in marathi)
#GA4 #Week12कीवर्ड बेसन --- अळुची पाने छोट्या छोट्या गावातून सगळीकडे मिळतात.त्याचे अनेक प्रकार करता येतात.खुप पौष्टिक आणि चवदार अशी अळुवडी हा त्यातला एक प्रकार. Archana bangare -
खमंग कुरकुरीत अळूवडी (alu wadi recipe in marathi)
#ashrआषाढ,श्रावण सुरू झाला की अनेक सण, मग त्यासाठी लागणारे पदार्थ, पावसाळ्यात रानभाज्या ही सगळी चंगळ अगदी गौरी गणपती, दसऱ्यापर्यंतच सुरू असते.ह्या सगळ्या चंगळवादात सणासुदीला एक चमचमीत पदार्थ हमखास पानात वाढलेला दिसतो. तो म्हणजे अळू वडी...😋😋आज माझ्या सासऱ्यांनी खास गावाहून अळूची पाने माझ्यासाठी पाठवली , आषाढ स्पेशल रेसिपीज थीमसाठी आज खास ही वडी बनवली. कोकणातल्या अळूच्या पानांची चवच न्यारी!!ही पानं सुपापेक्षाही मोठी असतात , त्यामुळे वडी करायला फार मजा येते...😊पावसाळ्यात या पानांना खूप छान चव असते.अळूची पाने ही पित्त आणि कफनाशक असून, भरपूर प्रमाणात असलेल्या लोह तत्त्वामुळे शरीरात रक्त वाढण्यास मदत होते.चला मग पाहूयात चमचमीत आणि कुरकुरीत अळूवडीची रेसिपी...😊 Deepti Padiyar -
अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)
#PRRअळूवडी असा पदार्थ आहे तो ताटात, पानावर वाढला जातो . प्रत्येक ताट वाढताना अळूवडी चे स्थान हे असतेचजवळपास सगळ्यांचीच आवडती अळूवडी हा पदार्थ आहे अळूवडी हा साईड डिश म्हणून सर्व्ह केला जातो.अळूची पाने जवळपास सर्वत्रच उगतात आणि सगळीकडेच अळूवडी ही बनवली जाते.भजीच्या प्रकारासारखाच हा प्रकार असतो बनवतानाही खूप छान वाटते आणि तयार झाल्यावर पटकन संपते पण.भारतात सर्वत्रच अळूवडी तयार होते आणि सगळेच याचा आनंद घेतात. सर्वात जास्त महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात सर्वात जास्त हा पदार्थ लोकप्रिय आहेअळूवडी याला गुजरातीत पात्रा अजूनही बऱ्याच वेगळ्या नावाने लोक या पदार्थाला ओळखत असेल.बऱ्याच ठिकाणी अळूवडी बरोबर पोळीही खातात आणि बऱ्याच ठिकाणी हिरवी चटणी मिरची बरोबरही अळूवडी खातात. वरण-भाताबरोबरही अळूवडी खूप छान लागतेआता वळूया रेसिपी कडे. Chetana Bhojak -
आळु वडी (alu wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#post2#पावसाळी गम्मततशी तर आळु चे पान वर्षभर मिळता व वड्या पण नेहमीच होतात .पण बाहेर जोरदार पाऊस पडत असताना..गरम गरम आळु वडी खायची मज्जा वेगळीच आहे Bharti R Sonawane -
अळूची भाजी (aluchi bhaji recipe in marathi)
#msr चिंच गूळ घालून केलेली अळूची भाजी भात आणि तूप अहाहा खूप मस्त लागते अगदी लहानपणाची आठवण येते माझ्या आजीनी केलेली ही भाजी मला फारच आवडते त्या पाककृती मी केली आहे. Rajashri Deodhar -
सात्विक अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#अळूवडी अळूवडी सर्वांची अतिशय आवडीची...पण अळूवडी म्हटले कि अगदी सुगरणीचेच काम ..पण मला तर वाटतं की अळूवडी करणे खूप सोपे आहे..वरवर जरी कठीण वाटत असले तरी ...फक्त काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर अळूवडी करणे एकदम सोपे..एकतर अळूची पाने फार जुन नको.दुसरे म्हणजे dark brown कलरचे देठ असलेले पाने घ्यायची.आणि वडी तळल्यावर कुरकुरित लागली पाहिजे.चला तर मग बघुया सात्विक अळूवडी ची रेसिपी... Supriya Thengadi -
खमंग अळूवडी (alu wadi recipe in marathi)
#ngnrखमंग खुसखुशीत अळूवडी ही नैवेद्यासाठी खास करतात. आपल्या थीमनुसार कांदा लसूण न घालता बनणारी अळूवडी..... अळूवड्याची रेसिपी अशी आहे की ज्यामध्ये कांदा-लसूण घालायची गरज नाही तरीही आंबटगोड आणि तिखट चवीची अळूवडी फारच छान लागते. मी अशीच अळूवडी नेहमी बनवते तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा 😊👍 Vandana Shelar -
अळू वडी (aloo wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10श्रावण भाद्रपद महिन्यामध्ये साधारण आळूची पाने खूप छान येतात. अळूचं गरगट पण केल जातो. पण माझ्या घरात आळूची वडी सगळ्यांना खूप आवडते.तरी आळुच्या वड्या ची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
अळूवडी (alu wadi recipe in marathi)
#पश्चिम # महाराष्ट्र😋अळूवडी😋अळूवड्या खायला जेवढ्या खमंग चटकमटक-कुरकरीत,असतात तेवढ्याच करायला खूप मेहनत, कठीण,आणि वेळखाऊ असतात. करणाऱ्याचा दम काढणाऱ्या आणि त्यांच सर्व कसब पणाला लावणाऱ्या असतात. कारण अळूवड्या बनविताना त्यांची चव व्यवस्थित जमवावी लागते. वडीला आंबटगोड चव लागली नाही, तर अळूवडी 'ही अळूवडी लागतच नाहीत😊अळूवड्याच हे'अळूवडीपण' असतं पानांना लावले जाणारे मसाले , त्यात वापरले जाणारे जिन्नस, पिठाचे प्रमाण, पिठाचा घट्टपणा ह्यात ते जमलं की अळूवडी तुम्हाला जमलीच समजा.😋खमंग-कुरकुरीत अळूवडी तोंडात टाकल्यावर तिची जी आंबड-गोड चव जिभेवर रेंगाळते, तिचं वर्णन करायला शब्दही सापडत नाहीत. त्यासाठी अळूवडी बनवून एखादी अळूवडीच तोंडात टाकायला पाहिजे हा.(कधी घेताय मग बनवायला)😃कुणाच्याही तोंडाला पाणी आणणाऱ्या अळूवड्या या जाडसर मोठ्या चमकदार पानांच्या,काळसर देठाच्या अळूपासूनच बनवतात. Prajakta Patil -
मिक्स पिठाची पौष्टिक अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#मिक्स पिठाची पौष्टिक अळू वडीअळू वडी हा एक पारंपरिक प्रकार आहे यात मी थोडा नाविन्यता आणुन पौष्टिक वकुरकूरीत अशी अळू वडी बनवली आहे.आमच्या कडे जनता कर्फ्यू मुळे मला अळूची पाने मिळत नव्हती. माझ्या एका मैत्रिणीला मी बोलले तिने लगेचच तिच्या कुंडितील अळूची पाने काढून दिली मी तिला आधी धन्यवाद देते. कारण मी ही थीम तीच्यामूळे पुर्ण करू शकले.हा पदार्थ पुर्वापार आपण करत आलो आहे.यात पाने वापरताना वडी लहान व कोवळी पाने तर भाजी साठी मोठी पाने वापरावी. आणि नेहमी दोघं प्रकार करताना चिंच कोळ वापरावा म्हणजे घशाला खाजरे येत नाही.आमच्या गावी (महाराष्ट्रात काही भागात नंदूरबार ,शहादा, दोंडायच्या इकडे चिंचेच्या चटणी बरोबर सर्व्ह करतात.) Jyoti Chandratre -
अळूवडी (aloo wadi recipe in marathi)
#KS2 पश्चिम महाराष्ट्र थीम, रेसिपी - २मी पश्चिम महाराष्ट्रातील... तसे बालपण मुंबईचे.. पण सुट्टीला गावाला येणे - जाणे असल्यामुळे गावच्या काही पदार्थाची चव न्यारीच 😍 गावाला मी खाल्लेली ही 'अळूवडी '... अजूनही तिची चव जिभेवर रेंगाळते, अप्रतिम..🥰. आमच्या कुलदेवीला वडी - भाकरीचा नैवेद्य असतो. वडी तळून न करता ती तव्यात फक्त परतलेली होती.. त्याप्रमाणेच मीही करून बघितली आहे, आणि सखींनो ती तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
अळुवडी (alu wadi recipe in marathi)
#shr श्रावण सुरू झाला आणि या अळूवड्या चाखल्याच नाही असा एखादाच बघायला मिळेल... तर आज श्रावण स्पेशल आमच्याकडे अळुवड्या Nilesh Hire -
पारंपारिक अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#अळूवडीअळूवडी आणि बर्फी रेसिपी 1 Varsha Pandit -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसीपीबुक #week 14 अळूवडी आणि बर्फी लहानपणापासून अळूवडी माजी सगळ्यात आवडती डिश आहे. आज ही ती आवड काही कमी झालेली नाही Swara Chavan -
-
-
More Recipes
टिप्पण्या (2)