पाटवड्या (सीकेपी पद्धत) (patwadya recipe in marathi)

#चंद्रकोर
#रेसिपीबुकweek6
पाटकरमावशी माझ्या आईची एक सीकेपी मैत्रीण होती.ती भावाच्या कुटुंबासोबत रहायची.दर उन्हाळ्यात आईबरोबर रत्नागिरीला रहायला जात असे.तिला स्वतःला स्वयंपाक करता यायचा नाही.पण ती तिच्या आईच्या हातचया पदार्थांचे वर्णन इतके मस्त करायची आणि त्या वर्णनाच्या भरात त्या पदार्थाची कृतीही साग्रसंगीत सांगायची. पण स्वयंपाक मात्र करायची नाही,कारण तिच्या तळहाताना खूप घाम येत असे.
तिच्या तोंडून ऐकलेली आणि तिच्या देखरेखीखाली केलेेली,ही तिच्या आईची पारंपारिक पाककृती.नारळाच्या दुधातला पाटवडीचा रस्सा ही सीकेपी पाककृती प्रसिद्ध आहे.
या वड्या नुसत्याच छान लागतात. पण तुम्ही खव्वयै असाल आणि आहारावर बंधनं नसतील शॅलो फ्राय करा.चवीला चार चाँद लागतात खरंच.
।
पण आज काही मी रस्सा केला नाही.फक्त वड्याच केल्या कारण वर सांगितलंच आहे.
घ्या तर साहित्य जमवायला.

कुकिंग सूचना
- 1
बेसन व्यवस्थित चाळून घ्या..कढईत दोन टीस्पून तेल वगळून बाकीचं गरम करा. त्यात लसूण घालून लालसर करावा.हिंग, जिरं मोहरीची ओवा आणि मेथीदाणे फोडणी करा.वाटण घालून कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्या.
- 2
त्यात हळद आणि बेसन घालून थोडे परता. पाणी घालून उकळी येऊ द्या. सतत हलवत रहा,म्हणजे गुठळ्या बिलकुल होणार नाहीत.
- 3
मिश्रण घट्ट झालं की त्यात उलथणं उभं करून पहा,उभं राहिलं तर भांड्यावर पाण्याचं झाकण ठेऊन मंद आचेवर दोन वाफा काढा.गॅस बंद करन,
त्यात २-३ चमचे तेल घालून चांगलं एकजीव करा. - 4
ताटाला तेलाचा हात लावून त्यावर तयार मिश्रण पसरून,समतल करून घ्या. वरून भरपूर खोबरं आणि कोथिंबीर पसरून हाताने थोडं दाबून घ्या.
- 5
थंड झाल्यावर चौकोनी किंवा तुम्हाला हव्या त्या आकाराच्या वड्या कापा आणि तशाच किंवा तळून आस्वाद घ्या.मी आपल्या थीमप्रमाणे चंद्रकोरीच्या आकारात कापल्या.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)