तिळगुळ वडी (tilgud wadi recipe in marathi)

#मकर मकरसंक्रात हा थंडीतील सण त्यामुळे शरीराला उष्णता मिळण्यासाठी तिळ व गुळाचे पदार्थ आर्वजुन केले व खाल्ले जातात त्यापैकीच ऐक पदार्थ म्हणजे तिळगुळ वडी चला तर बघुया हि वडी कशी बनवायची ते

कुकिंग सूचना
- 1
तिळगुळ वडी बनवण्या साठीचे सर्व साहित्य मेजरमेंट प्रमाणे डिशमध्ये काढुन ठेवा
- 2
काजु थोडे कुटुन लहान तुकडे करून ठेवा शेंगदाणे भाजुन साल काढुन थोडे कुटुन बाजुला ठेवा नंतर तिळ व सुके खोबरे खसखस स्लो गॅसवर वेगवेगळे भाजुन एकत्र प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढुन ठेवा
- 3
नंतर त्यात कुटलेले काजु व शेंगदाणे मिक्स करा
- 4
कढई गरम झाल्यावर त्यात साजुक तुप टाकुन लगेच किसलेला गुळ टाकुन स्लो गॅसवर गुळाचा गोळीबंद पाक करून घ्या(तयार पाक वाटीत पाणी घेऊन त्यात२-३ थेंब टाकुन गोळी होऊन ताटात गोळी आपटुन तडकन आवाज आला तर समजावे आपला पाक रेडी आहे)
- 5
तयार पाकात लगेच सर्व भाजलेले व कुटलेले साहित्य व वेलची पावडर टाकुन मिक्स करा व गॅस बंद करा
- 6
प्लॅस्टिक शिटवर वरील मिश्रणाचा गोळा ठेवुन थापुन घ्या व थंड करा
- 7
थंड झाल्यावर सुरीने वड्या पाडा
- 8
तिळ गुळाच्या वड्या प्लेटमध्ये डेकोरेट करून सर्व्ह करा सोबत हळदी कुंकु साखर फुटाणे गुलाब फुलांनी
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या