मशरूम चिली (mushroom chili recipe in marathi)
#SR
नमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्या बरोबर मशरूम चिली ही रेसिपी शेअर करतेय.
मशरूम चिली (mushroom chili recipe in marathi)
#SR
नमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्या बरोबर मशरूम चिली ही रेसिपी शेअर करतेय.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मशरूम स्वच्छ धुऊन ते कट करून घ्यावेत. एका वाटी मध्ये मैदा व कॉर्न फ्लावर घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ, लाल तिखट पावडर व काळीमिरी पावडर घालावे.आता पाणी घालून याची आपण पेस्ट करून घेणार आहोत ही पेज जास्त जाड किंवा जास्त पातळ असू नये.
- 2
तोपर्यंत एका कढईमध्ये तेल घालून ते गरम करण्यासाठी ठेवावे व कॉर्नफ्लॉवर व मैद्याच्या पेस्टमध्ये आपण कट केलेले मशरूम त्यामध्ये घालावे. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर हे मशरूम तेलामध्ये घालून तळून घ्यायचे आहेत
- 3
अशाप्रकारे सर्व मशरूम तळून घ्यावेत ते गार होईपर्यंत आपण कांदा व कॅप्सिकम,आलं,लसूण,हिरवी मिरची हे सर्व कट करून घ्यावेत. एका वाटीमध्ये दोन टीस्पून कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये पाणी घालून कॉर्नफ्लॉवर ची पेस्ट करून घ्यावी.
- 4
आता एका कढई मध्ये तेल घालावे तेल गरम झाल्यावर आले लसूण व हिरवी मिरची घालून हाय फ्लेमवर फ्राय करावे. त्यानंतर कट केलेला कांदा व कॅप्सिकम घालून दोन मिनिटे काय करावे यामध्ये मी ग्रीन व रेड यलो कॅप्सिकम वापरले आहेत.
- 5
त्यानंतर आता त्यामध्ये टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, व्हिनेगर,साखर व मीठ घालून दोन मिनिटे फ्राय करून घ्यावे. मग नंतर त्यामध्ये आपण तयार केलेली कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालावी. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यावर आता त्यामध्ये आपण तळून ठेवलेले मशरूम ऍड करावेत
- 6
ही झाली मशरूम चिली तयार ही मशरूम चिली गरमागरम सर्व्ह करावी ही गरमच खूप छान लागते.
Similar Recipes
More Recipes
- चटपटा मसाला काॅर्न (chatpata masala corn recipe in marathi)
- कच्च्या पपईचे फ्राईज (kachya papayachi fries recipe in marathi)
- नाचणी - ओट्स - मखाना लाडू (nachni oats makhana ladoo recipe in marathi)
- बटाट्याचे चिप्स (sundried) (batatyache chips recipe in marathi)
- पनीर सॅलड (paneer salad recipe in marathi)





















टिप्पण्या