गरम भेळ (garam bhel recipe in marathi)

ओली भेळ आपण नेहमी खातो ती गरम नसते पण आता पावसाळ्यात गरमागरम खायचे मन करते तेव्हा ही रेसिपी करू शकतो
गरम भेळ (garam bhel recipe in marathi)
ओली भेळ आपण नेहमी खातो ती गरम नसते पण आता पावसाळ्यात गरमागरम खायचे मन करते तेव्हा ही रेसिपी करू शकतो
कुकिंग सूचना
- 1
कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग जीरे मोहरी ह्याची फोडणी करून घ्या. फोडणी तडतडली की त्यात हळद,मटार आणि मक्याचे दाणे टका आणि झाकण ठेवा
- 2
कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. टोमॅटो च्या पण फोडी करा चौकोनी. आता चिरलेले सर्व मटार आणि मक्या सोबत टाकून छान परतून घ्या. आता त्यात चिरलेल्या मिरच्या टका.
- 3
आता मावतील तेवढे कुरमुरे टका आणि छान एक जीव करा. थोडे कुरमुरे ठेवून द्या. आता झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या. त्यात आता मीठ आणि लाल तिखट टाकून परतून घ्या आणि कढीपत्त्याची पाने तोडून टाका.
- 4
खायला देताना बाजूला ठेवलेले सुके कुरमुरे, गोड चटणी (ऑपशनल) फरसाण आणि शेव टाकून सर्व्ह करा. सजावटीसाठी कोथिंबीर पेरा
Similar Recipes
More Recipes
- साऊथ इंडियन टोमॅटो चटणी (south indian tomato chutney recipe in marathi)
- साऊथ इंडियन पानियारम/कारा चटणी (kara chutney recipe in marathi)
- लेफ्ट ओवर भाकरीचा चिवडा (leftover bhakhricha chivda recipe in marathi)
- रेस्टॉरंट स्टाईल पनीर लसूणी करी (paneer lasooni curry recipe in marathi)
- सेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)




टिप्पण्या (7)