तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3
आज गुरुवार स्वामी समर्थां ना नैवेद्यासाठी तांदळाची खीर बनवलेली आहे त्याचीच रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करतेय.
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3
आज गुरुवार स्वामी समर्थां ना नैवेद्यासाठी तांदळाची खीर बनवलेली आहे त्याचीच रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करतेय.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मी तांदूळ पंधरा मिनिटांसाठी भिजत घातले. मग पंधरा मिनिटानंतर ते मिक्सरवर थोडेसे जाडसर वाटून घेतले आपल्याला याची पेस्ट नाही करायचे खीर दाणेदार नाही होणार. यामध्ये तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता मी आंबेमोहोर तांदूळ वापरले आहेत. त्यानंतर एक लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवले आहे त्यातील थोडेसे दूध काढून आपण त्यामध्ये केशर काड्या घालून ठेवणार आहोत.
- 2
हे दूध साधारण पाच ते दहा मिनिटे उकळून घेतल्यावर मग त्यामध्ये आपण तयार केलेली तांदळाची पेस्ट मध्ये ऍड करणार आहे व गॅस मिडीयम वर करून ती आपल्याला शिजू द्यायची आहे. दुधामध्ये तांदूळ व्यवस्थित शिजल्यावर मग आपल्याला त्यामध्ये साखर ऍड करायची आहे मग त्यानंतर केशर दूध, ड्रायफ्रूट्स व वेलची पावडर हे सर्व एकत्र करून आपल्याला जशी घट्ट किंवा पातळ खीर हवी तशी बनवावी.
- 3
ही खीर तुम्ही गरम ही खाऊ शकता किंवा बनवून ठेवून फ्रिजमध्ये ठेवल्यावर थंडगार खीर खूप छान लागते.
Similar Recipes
More Recipes
- गरम भेळ (garam bhel recipe in marathi)
- साऊथ इंडियन टोमॅटो चटणी (south indian tomato chutney recipe in marathi)
- लेफ्ट ओवर भाकरीचा चिवडा (leftover bhakhricha chivda recipe in marathi)
- साऊथ इंडियन पानियारम/कारा चटणी (kara chutney recipe in marathi)
- रेस्टॉरंट स्टाईल पनीर लसूणी करी (paneer lasooni curry recipe in marathi)





टिप्पण्या