मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
Dipali Kathare @cook_24949351
#cpm7
आज तुमच्या बरोबर मसाला पराठा ची रेसिपी शेअर करतेय.
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7
आज तुमच्या बरोबर मसाला पराठा ची रेसिपी शेअर करतेय.
कुकिंग सूचना
- 1
गव्हाच्या पिठामध्ये मीठ घालून आपण चपातीसाठी मळतो तशी कणिक मळून घ्यावी. मग ती दहा मिनिटांसाठी साइडला ठेवावी.
- 2
पोळपाटावर एक गोळा घेऊन तो थोडासा लाटून घ्यावा. मग त्यावर लाल तिखट पावडर, जिरा पावडर, चाट मसाला व मीठ घालावे. मग त्यामध्ये थोडेसे तेल घालून मिक्स करून पसरवून घ्यावे.
- 3
मग त्यावर तीळ घालावेत. त्यानंतर कोथिंबीर चिरून त्यावर ऍड करावी.
- 4
त्यानंतर मी फोटोत दाखवल्याप्रमाणे पोळी ची घडी घालून घ्यावी.
- 5
आता हा पराठा लाटून तव्यावर तेल किंवा तूप घालून खरपूस भाजून घ्यावा.
- 6
गरमागरम मसाला पराठा लोणचे किंवा सॉस बरोबर खाण्यासाठी तयार आहे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15334841

















टिप्पण्या