चाॅकलेट कोकोनट बर्फी (chocolate coconut barfi recipe in marathi)

Chhaya Chatterjee @chhaya14
नारळाची वडी जरा वेगळ्या पद्धतीने केली. लहान मुलांना आवडेल अशी.
चाॅकलेट कोकोनट बर्फी (chocolate coconut barfi recipe in marathi)
नारळाची वडी जरा वेगळ्या पद्धतीने केली. लहान मुलांना आवडेल अशी.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ओला नारळ किसून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा.
- 2
कढईत साखर घालून एक टेबलस्पून पाणी घालून साखर विरघळून घ्यावी. नंतर त्यात किसलेला नारळ, मिल्क पावडर, डेअरी मिल्क चाॅकलेट आणि तूप घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत हलवत रहावे. मध्यम आचेवर.
- 3
मिश्रण चांगले घट्ट झाल्यावर गॅस बंद करावा. एका ताटाला तूप लावून त्यावर बटर पेपर ठेवून त्यावर पण तूप लावून सर्व मिश्रण त्यावर घालून जाडसर थापून घ्यावे
- 4
नंतर थंड झाल्यावर वड्या कापून घ्यावे
- 5
चाॅकलेट कोकोनट बर्फी तयार. फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि मग खावे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15435291





टिप्पण्या