कुकिंग सूचना
- 1
प्रथम मेथीची भाजी स्वच्छ निवडून धुवून चिरून घ्यावी
- 2
आता एका परातीत गव्हाचे पीठ, तांदळाचे पिठ, चिरलेली मेथी, हळद, तिखट, गोडा मसाला, तीळ आणि आले, लसूण, मिरची पेस्ट करून वरील पिठात घालावी मीठ घालावे
- 3
आता त्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे आणि 15 मिनिटे पीठ झाकून ठेवावे
- 4
आता 15 मिनिटांनी पिठाला तेल लावून परत छान मळून घ्यावे
- 5
आता परातीत सुखे गव्हाचे पीठ लागत असल्यास थोडे घ्यावे पराठा लाटताना लागत असल्यास घ्यावे
- 6
आता बॉल एवढा गोळा घेऊन त्याची पोळी लाटावी
- 7
आता गरम तव्यावर दोन्ही साइडने तूप सोडून गोल्डन खरपूस भाजून घ्यावी
- 8
आता गरम गरम मेथीचे पराठे तयार आहेत सर्विंग प्लेट मध्ये दही किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15722313




टिप्पण्या (7)