मेतकूट (metkut recipe in marathi)

मेतकूट (metkut recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व डाळी नि धान्य अगदी थोड्या ओल्या फडक्याने पुसून घ्या.खालीलप्रमाणे तयारी करा.
- 2
खालील पदार्थ भाजायचे नाहीत म्हणजे हळद,हिंग,सुंठ,मीठ
- 3
आता एक एक करून डाळी,तांदूळ,गहू छान खमंग भाजून घेणे.डाळी खालीलप्रमाणे भाजा.चण्याची डाळ भाजून झाली कि ताटात ठेवा व त्यावर हिंग,हळद,सुंठ टाका म्हणजे आपण दुसर्या डाळी टाकल्या कि हे पदार्थ थोडे गरम होऊन भाजले जातील.
- 4
सगळ्या डाळी गहू तांदूळ भाजलेले आहे.आता आपण सर्व मसाले एकत्र भाजायचे आहेत प्रथम धणे टाका नि एक मिनिटाने बाकी सर्व टाका
(मेथी सोडून) दोन मिनीटात हे भाजून होईल मग गॅस बंद करा नी मेथी घाला पॅन गरम आहे तेव्हढे बस होते मेथी जास्त भाजली तर कडवटपणा जास्त येतो. - 5
आता हे सर्व भाजलेले मिसळून मिक्सरमधून बारीक करा नी चाळणीने चाळा.
- 6
मेतकूट तयार आहे.कधीही गरम गरम मऊ भात, मेतकूट नी तुप मस्त खा एकदम अप्रतिम लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेतकूट (metkut recipe in marathi)
#CN#मेतकूट हा महाराष्ट्रातील पारंपारिक पदार्थ आहे.पण हल्ली फार कमी लोकांकडे बनवला जातो. अतिशय रूचकर नि पोटाला हलका पदार्थ. कोणी आजारी असेल नि तोंडाला चव नसेल तर मेतकूटगरम गरम मऊ भात नी त्यावर मस्त तुपाची धार तुमची भुक नक्कीच चाळवते .चला तर बघुया मेतकूट कसे करायचे ते. Hema Wane -
मेतकूट (metkut recipe in marathi)
#EB1 #W1 ज्यांना हलका आहार घ्यायचा आहे त्यांनी मेतकूट आणि मऊभात खावा. ह्याच मेतकूटाची रेसिपी मी आज घेऊन आले आहे. Prachi Phadke Puranik -
मेतकूट (metkut recipe in marathi)
#EB1 #W1महाराष्ट्रात प्रत्येक घरात आई किंवा आज्जीने बनवलेल मेतकूट हे असतच. कधी चटणी म्हणुन तर कधी पोहे चीवड्याचा साथीदार बनुन हे मेतकूट त्याची चव अजूनच वाढवत असते. बाहेर पाऊस पडत असेल आणि भिजून आल्यावर गरमागरम अंबेमोहोर भात त्यावर मेतकूट आणि वरून तुपाची धार म्हणजे स्वर्गसुख. आजारी माणसाची चव हमखास परतवून देणारा पदार्थ म्हणजे मेतकूट भात. असा हे मेतकूट फायबर,प्रोटीन व iron चा ऊत्तम स्त्रोत ही आहे. Anjali Muley Panse -
मेतकूट (metkut recipe in marathi)
#EB1 #W1मेतकूट हा महाराष्ट्रीयन पारंपारीक पदार्थ थंडीच्या दिवसात गरमा गरम मऊ भात आणी खमंग मेतकूट आनंदाची परमावधी. SONALI SURYAWANSHI -
मेतकूट (metkut recipe in marathi)
#EB1 #W1विंटर स्पेशल रेसिपीजE book challengeमहाराष्ट्रात आणि दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये हे मेतकूट बनवतात. हे हलके आणि पौष्टिक असते. आजारी लोकांना गरम मऊ भाता बरोबर तूपाची धार घालून हे देतात. भाकरीआणि चपाती मेतकुटात तेल घालून खातात.दही भात मेतकूट पण छान लागते.पालेभाजीत मेतकूट घालून चपाती आणि भाकरी बरोबर खुप मस्त लागतं. असं हे खमंग मेतकूट कसे करायचे ते पाहूया. Shama Mangale -
पारंपारिक मेतकूट (metkut recipe in marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल रेसिपीज e book..#मेतकूट पारंपारिक मेतकूट हे महाराष्ट्रातील बहुतेकांचा अतिशय आवडीचा पदार्थ.. आमच्या घरात तर विशेष आवडीचा. या मेतकूटाशी आमचं मेतकूट जमलंय म्हणा ना..😀..आमचं आणि मेतकूटाचं बारा ही महिने सदा सर्वकाळ छान जमतं..😊..म्हणजे आमची पर्वणीच असते😍 ..गरमागरम आंबेमोहोर तांदळाचा मऊसूत भात,त्यावर मेतकूट,चवीला मीठ,आणि ताटात ओघळ जाईपर्यंत तुपाची धार,सोबत पोह्याचा पापड,एखादं लोणचं..लिंबाचं...अहाहा..क्या बात है..हे सगळ एकत्र कालवले की असा काही सुगंध दरवळतो की बास..बोटांना पण कितीतरी वेळ हा सुगंध येत असतो.. अगदी स्वर्गसुख हो....😋😋..आता लक्षात आलं असेल आमचं मेतकूट कां जमलंय ते..😀 protein, carbohydrates,fats,vitamins चा संगम असलेला हा मेतकूट भात..अगदी पोटभरीचा..Soul food..😇.. चला तर मग या पारंपरिक खमंग मेतकूटाच्या रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
-
-
पारंपारिक मेतकूट (metkut recipe in marathi)
#KS7मेतकूट ही पारंपारिक महाराष्ट्रातील खास रेसिपी.मुख्यत्वे कोकणातल्या माणसांचे हे मेतकूट भलतेच आवडीचे.एखाद्याशी अगदी "मेतकूट जमलंय",म्हणजे अगदी जवळचेच झालेत असा या वाक्प्रचाराचा अर्थ! ....तर हे मेतकूटही असेच सर्वसमावेशक डाळी,गहू,तांदूळ यांचे..प्रोटीन्स आणि कार्ब्ज युक्त शिवाय त्यातले सुगंधी मसाले त्यावर चार चाँंद लावतात...मस्त मऊसूत गुरगुट्या भात चांगला रटरट शिजलेला...त्यावर साजूक तुपाची भली मोठी धार....अगदी भात भिजेपर्यंत,त्यावर हे झटकेदार मेतकूट, चवीनुसार मीठ....एखादी लिंबाच्या मुरलेल्या लोणच्याची फोड,एखादा तळलेला पोह्याचा किंवा नाचणीचा पापड तोंडी लावण्यास.......बास!!सकाळी नाश्त्याला खाल्ला तरी दुपारपर्यंत भूक लागायची नाही.शिवाय पचायला हलके,जेवणाची रुची वाढवणारे. तुम्ही आजारी असा की कामाच्या व्यापात असा...हा मेतकूट भात म्हणजे वरदानच!कधी कधी वाटते कोणी केले असतील हे पदार्थ पहिल्यांदा?त्याची चव कशी वाढत गेली असेल....जेव्हा डाएटप्लँन हा शब्दही आपल्याकडे माहित नव्हता त्याकाळात कोणी हे सुंदर पदार्थांचे शोध लावले असतील?हल्ली अनेक ब्रँडची मेतकूटं बाजारात मिळतात पण कालौघात आपण घरी करणंच विसरत चाललोय!रेडी टू ईट,रेडी टू कुक च्या जमान्यात हे पदार्थ घरी बनवलेच जात नाहीत.रोजची पीठंही आपण विकत आणतोय तर मेतकूटाचा उपद्व्याप कोण करणार?नोकऱ्यांमुळे वेळही नसतोच.जुन्या जाणत्या सुगरणीही आता अचूक रेसिपी सांगायला असतीलच असे नाही.कुटुंब लहान...मग कितीसे लागणार?विकतचे चांगले नसते असे नाहीच पण घरी स्वतः करुनही पहायलाच हवे तरच ह्या पदार्थांची चव कळेल.त्यातले घटक समजतील,त्याची न्युट्रीशनल व्हँल्यु कळेल..असे हे विस्मरणात चाललेले मेतकूट मी मात्र कायम घरीच बनवते😊 Sushama Y. Kulkarni -
-
झटपट मेतकूट (metkut recipe in marathi)
#EB1#W1"झटपट मेतकूट" मेतकूट हा मराठमोळा चविष्ठ पदार्थ !! आहार तज्ज्ञांच्या भाषेत सांगायचे झाले तर मेतकुट हे कर्बोदके आणि प्रथिने यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन... आणि हलके स्पाईसड असल्याने पोटालाही बरे... दही मेतकूट, मउभात मेतकूट आणि त्यावर साजूक तुपाची धार हे अगदी चविष्ट आणि रुचकर समीकरण.... याच मेतकूटची इन्स्टंट रेसिपी करून पहिली, अगदी भारी झालेली, आणि पटकन होत असल्याने वेळेवर देखील बनवु शकतो...आहे की नाही गम्मत....😊चला तर मग रेसिपी पाहूया....😊😊 Shital Siddhesh Raut -
-
-
मेतकूट (metkut recipe in marathi)
#EB1 #W1#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज #Ebookथंडीच्या दिवसात गरम उबदार रेसिपी खायलाचं हवी तर मी आज मेतकूट भात बनविण्याचा बेत केला पहिल्यांदा करून बघीतले खूप छान वाटली😋😋 Madhuri Watekar -
मेतकूट (metkut recipe in marathi)
#KS7 थीम:7 लाॅस्ट रेसिपीज.रेसिपी क्र. 2विस्मृतीत गेलेली मेतकूट ही रेसेपी.आमच्या घरी पूर्वी मिस्टर, सासूबाई,मोठी मुलगी यांना फार आवडत असे. गरमागरम भात,त्यात वर मेतकूट, वरती तूप एकत्र कालवून खातात.लहान मुले व वयस्कर व्यक्ती यांच्या साठी खूप पौष्टिक आहे. Sujata Gengaje -
मेतकूट (metkut recipe in marathi)
#cnसर्व डाळी आणि मसाले यांनी बनलेले मेतकूट खूप चव आणणारे असते. मेतकूट गरम भात आणि तूप...अहा..खाण्यात जी काही मजा आहे ती सांगता येणार नाही. आजारी माणसाच्या तर तोंडाची चव परत आणते हे मेतकूट. kavita arekar -
-
मेतकूट (metkut recipe in marathi)
#CN चटणी रेसिपीज थीम साठी मी आज माझी मेतकूट रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मेतकूट (metkut recipe in marathi)
#EB1#w1#मेतकूटरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी मेतकूट ही रेसिपी तयार केली. खूपच पौष्टिक असा हा खाद्यपदार्थ आहे तो आपण तयार एकदा तयार करून ठेवला केव्हाही आपण जेवणातून घेऊ शकतो कधीच काय खावेसे वाटले किंवा जिभेला चव नसल्यावर आपल्याला भाताबरोबर मेतकूट आणि तूप टाकून खायला खूप आवडेल चवही येते आणि आरोग्यही छान रहाते आजारी व्यक्तीला नेहमीच मऊ भात आणि मेतकूट दिला जातोरेसिपी तू नक्कीच बघा मेतकूट रेसिपी Chetana Bhojak -
मेतकूट रेसिपी (metkut recipe in marathi)
#KS7# लॉस्ट रेसिपीज ऑफ महाराष्ट्र#पारंपारिक मेतकूट रेसिपी Rupali Atre - deshpande -
-
मेतकुट (metkut recipe in marathi)
#EB1 #Week1मेतकुट हा स्वादिष्ट, रूचकर व पौष्टिक आहे. मेतकूट रायता, चटण्या ,तसेच चिवडा मधे घालून त्याचा स्वाद वाढवतो. आजारातून उठलेल्याच्या तोंडाची चव येण्या साठी हमखास तूपभात मेतकुट देतात.मेतकुट बनवून वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो. Arya Paradkar -
मेतकुट (metkut recipe in marathi)
#EB1#W1हिवाळ्यात मस्त गरम गरम तुप आणि मेतकुट घालुन ,बोटे चाटुन भात खाण्याची मजाच काही और आहे.....चला तर पाहुया या खमंग मेतकुटची रेसिपी.... Supriya Thengadi -
मेतकुट (metkut recipe in marathi)
#EB1 #W1थंडीमध्ये मेतकुट खायला खुप चवीष्ट लागते आणि गरम भात तुप मेतकुट , दह्यातले मेतकुट खुप चविष्ट लागते Sushma pedgaonkar -
मेतकूट (metkut recipe in marathi)
मेतकूट ही एक पारंपरिक रेसिपी आहे जी स्त्रियांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे . अथांग परिश्रमानंतर व खूप रीसर्च करून अगदी सोप्या पद्धती ने बनवलेले मेतकूट चवीला खूप छान लागते .तुम्ही भात व तूपासोबत हा खाऊ शकता .पण मी आमटी व डाळी मध्ये दोन छोटे चमचे मेतकूट व तूप टाकून खाते .एकदा नक्की करून पहा .#EB#W1 Adv Kirti Sonavane -
खमंग मेतकूट (metkut recipe in marathi)
मैत्रिणींनो,सर्व प्रकारच्या चटण्या एका बाजूला आणि मेतकूट एका बाजूला.मेतकूट आणि भात खाण्याची मजा काही औरच. तुम्ही पण करून बघा. Archana bangare -
-
-
पारंपरिक मेतकूट रेसिपी (metkut recipe in marathi)
#EB1#W1 ' मेतकूट ' हा एक मराठी अहारामधील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ आहे ..महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागात याची रेसिपी थोड्या फार प्रमाणात वेगवेगळी असू शकते..मी या रेसिपी मध्ये हरभरा डाळी ऐवजी पंढरपुरी डाळ ( फुटाणे) वापरले आहेत..त्यामुळे डाळ भाजण्याचा वेळ कमी लागतो.. मेतकूट मध्ये असणाऱ्या विविध डाळी मुळे यातील प्रथिनांचे प्रमाण वाढले आहे . त्यामुळे लहान मुले, तरुण, वयोरुद्ध अशा सर्वांसाठी एक उपयुक्त पदार्थ . यातील सर्व डाळी भाजून घेतल्या मुळे आणि यातील हिंगामुळे हे पचायला अतिशय हलके असते..हिंग आणि सुंठ यांच्या वापरामुळे हे तोंडाची चव वाढवते..चला तर मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
मेतकूट (metkut recipe in marathi)
#healthy #traditionalमेतकूट ही एक महाराष्ट्रीयन पद्धतीची पारंपरिक रेसिपी आहे. साधा, सोपा पटकन होणारा भरपूर पौष्टिक असा हा पदार्थ.आजच्या पिझ्झा ,नूडल्स च्या जमान्यात याचे महत्त्व थोडे कमी झाले आहे. पण तरीही खूप काम करुन दमल्यावर, जागरण झाले असेल तर, आजारामुळे तोंडाला चव नसेल तर मेतकूट, गरम गरम मऊ भात आणि वर साजूक तूप असे नुसते नाव काढले तरी बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटते. विविध डाळी, गरम मसाल्याचे पदार्थ एकत्र करुन, भाजून एक छान मिश्रण तयार होते जे अप्रतिम चवीचे तर असतेच पण प्रोटीन्स, अमिनो अँसिड्स,लोह या सर्वांनी परिपूर्ण असे पूर्ण अन्न बनते. चला तर मग बघुया याची कृती... मी अगदी छोटे माप घेऊन घरगुती स्वरूपात मेतकूट कसे बनवता येईल याचे प्रमाण दिले आहे.Pradnya Purandare
More Recipes
टिप्पण्या