घोसाळ्याची भजी (Ghosalyachi Bhajji Recipe In Marathi)

#Cooksnap_Challenge
#भजी_रेसिपीज
#घोसाळ्याची_भजी
घोसाळे ही एक अतिशय प्राचीन भाजी आहे आणि तिचा उगम भारतातला मानला जातो. हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. घोसाळे लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, आर्द्रता ,जीवनसत्व ब आणि क, चरबी आणि फायबर, कॅरोटीन, रिबोफ्लेविन, नियासिन, प्रथिने, खनिजे यांनी समृद्ध आहे. आयुर्वेदानुसार घोसाळे अग्निवर्धक, शीतल, रुचकर आणि कफनाशक आहे.
त्यामुळे आपण हे आरोग्यदायी घोसाळे विविध रेसिपींच्या स्वरूपात खाऊ शकतो. आपण घोसाळ्यापासून मूग डाळ घालून चविष्ट भाजी , स्वादिष्ट रायता तयार करु शकतो किंवा चमचमीत भजी देखील .😋.. विशेष म्हणजे पावसाळ्यात बाहेर धो धो कोसळणारा पाऊस, हातात गरमागरम भजीची प्लेट आणि सोबत आलं घालून केलेला फक्कड चहाचा कप...अहाहा... मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं???...मला विचाराल तर हेच ते स्वर्गसुख..😍😋😋
आज मी आपली मैत्रीण @Rajashree_chef1 राजश्री येळे यांची घोसाळ्याची भजी थोडा बदल करुन cookdnap केली.राजश्री ,खूप खमंग आणि चवदार झालीत भजी..😋😍..Thank you so much dear for this wonderful recipe..🌹❤️

कुकिंग सूचना
- 1
प्रथम घोसाळे स्वच्छ धुऊन त्याच्या गोल किंवा लांबट पातळ चकत्या करून घ्या. आणि त्या किंचित मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा म्हणजे काळ्या पडणार नाहीत.
- 2
आता एका वाडग्यामध्ये बेसन,तांदूळ पीठ, तिखट, हळद, जीरे,हिंग,धने पावडर चवीनुसार मीठ घाला आणि व्यवस्थित एकत्र करा.
- 3
आता यामध्ये गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालत पीठ भिजवून घ्या.पीठ जास्त ही घट्ट नको किंवा अगदी पातळ ही भिजवायचे नाहीये. घोसाळ्यच्या चकत्यांना व्यवस्थित पीठ लागेल या प्रकारे पीठ भिजवा. आता यामध्ये दोन चमचे गरम तेल घालून पुन्हा व्हिस्कर च्या साह्याने एका दिशेने 3-4 मिनिटे चांगले फेटून घ्या म्हणजे भजी हलकी होतील.
- 4
आता एका कढई मधे तेल तापत ठेवा. तेल तापले की थोडे भिजवलेले बेसन गरम तेलात घाला.हे बेसन जेव्हा तेलात फुलून वर येते तेव्हा तेल तापले आहे असे समजावे. आता घोसाळ्याच्या चकत्या पिठात बुडवून गरम तेलात सोडा.
- 5
आता मध्यम आचेवर वर ही भजी की दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर तळून घ्या.
- 6
तयार झाली आपली गरमा-गरम घोसाळ्याची ची भजी.ही भजी सॉस किंवा हिरवी चटणी आणि आल्याचा चहाबरोबर सर्व्ह करून पावसाळा एन्जॉय करा.
- 7
Similar Recipes
More Recipes
- उरलेल्या मिसळपावचा स्नॅक्स (Left Over Misal Pav Snacks Recipe In Marathi)
- ब्रेडचा उपमा (Breadcha Upma Recipe In Marathi)
- फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
- शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
- उडदाची डाळ व तुरीच्या डाळीची भजी (Urad Dal Turichya Dalichi Bhajji Recipe In Marathi)

टिप्पण्या (3)
Massssst