ओल्या नारळाची वडी (Olya Naralachi Vadi Recipe In Marathi)

Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
ओल्या नारळाची वडी (Olya Naralachi Vadi Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पॅनमध्ये तूप टाकून ओले खोबरे पाच मिनिट परतून घ्यावे
- 2
खोबऱ्याचा थोडासा ओलावा कमी झाल्यानंतर त्यामध्ये चार चमचे साईचे दूध घालून मिक्स करून घ्यावे दूध मिक्स झाल्यानंतर अर्धी वाटी साखर घालून मिक्स करावे
- 3
साखर घालून मिक्स केलेले मिश्रण दहा मिनिट परतून घ्यावे मिश्रण कढईपासून सुटायला लागले की त्याचा छान गोळा तयार होतो
- 4
छान गोळा तयार झालेले मिश्रण एका तूप लावलेल्या ताटामध्ये टाकून मिश्रण एकसारखं उलतण्याने किंवा मग स्मॅशरने छान प्रेस करून पसरून घ्यावे
- 5
मिश्रण थोडेसे कोमट असतानाच त्याला वड्याचे आकार देऊनत्यावरती बदामाचे काप लावावेत आणि नंतर वडीचे मिश्रण थंड झाल्यावरती वड्या काढून घ्याव्यात
- 6
तयार आहेत आपल्या श्रावण स्पेशल रक्षाबंधन स्पेशल झटपट तयार होणाऱ्या ओल्या नारळाच्या वड्या किंवा मग बर्फी
Top Search in
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16423555




















टिप्पण्या