खजूर लाडू (Khajoor Ladoo Recipe In Marathi)

#खजूरलाडू
साखर किंवा गुळ न वापरतात तयार केलेले पौष्टिक खजूर लाडू हे लाडू तयार करून बंद कंटेनर मध्ये १५ दिवस ते १ महिना स्टोअर करू शकतो . हे लाडू उपवासासाठी पण चालतात
खजूर लाडू (Khajoor Ladoo Recipe In Marathi)
#खजूरलाडू
साखर किंवा गुळ न वापरतात तयार केलेले पौष्टिक खजूर लाडू हे लाडू तयार करून बंद कंटेनर मध्ये १५ दिवस ते १ महिना स्टोअर करू शकतो . हे लाडू उपवासासाठी पण चालतात
कुकिंग सूचना
- 1
अर्धा चमचा साजूक तूप पॅनमध्ये घालून काजू बदामाचे काप थोडेसे परतून घ्यावे सुका खोबऱ्याचा कीस तूप न टाकता थोडासा भाजून घ्यावा
- 2
नंतर त्याच पॅनमध्ये १-चमचा साजूक तूप टाकून डिंक फुले पर्यंत तळून घ्यावा
- 3
तळलेला डिंक आणि ड्राय फ्रुट्स चे काप थंड झाल्यावर मिक्सर ने जाड सर काढून घ्यावे भाजलेला खोबऱ्या चा खिस थंड करून घ्यावा
- 4
पॅन मध्ये अर्धी चमचा साजूक तूप टाकून खजूर मऊ होईपर्यत परतून घ्यावा (खजूराचे तुकडे अगदि सॉफ्ट आणि एकजीव करून घ्यावे) नंतर त्या मिश्रणा मध्ये मिक्सर ने बारीक केलेले ड्रायफ्रूट आणि डिंक भाजलेले थोडे सुके खोबरे टाकावे
- 5
आणि सर्व एकजीव होई पर्यंत मिक्स करून घ्यावे आणि थंड करण्यासाठी एका बाऊलमध्ये काढून घ्यावे नंतर त्यामध्ये वेलची पूड घालून मिक्स करून घ्यावे
- 6
मिश्रण थोडेसे कोमट झाल्यानंतर त्याचे लाडू बांधून घ्यावे आणि वरतून खोबऱ्याच्या खिस लाऊन घ्यावा
- 7
तयार आहेत पौष्टिक खजूर लाडू
Top Search in
Similar Recipes
More Recipes






















टिप्पण्या (2)