कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक मोठा बाऊल घेऊन त्यात बेसन घ्यावे
- 2
नंतर या बेसनात मीठ साखर व सायट्रिक ऍसिड घालावे
- 3
नंतर सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावे त्यात दोन चमचे तेल घालावे ते पण मिश्रण मिक्स करून घ्यावे नंतर त्यात एक कप पाणी घेऊन ते एकदम न टाकता लागत लागत घालावे व ढोकळ्याचे पीठ भिजवून घ्यावे दहा मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवावे
- 4
नंतर ज्या भांड्यात ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला तेलाने ग्रीस करून घ्यावे व कुकरमध्ये किंवा एका भांड्यात पाणी गरम करण्यास ठेवावे
- 5
दहा मिनिटांनी ढोकळ्याचे भिजवलेले पीठ परत मिक्स करून घ्यावे छान हलवून घ्यावे म्हणजे फुलते त्यात आता सोडा घालावा व परत पीठ मिक्स करून घ्यावे नंतर ग्रीस केलेल्या भांड्यात घालावे व कुकरमध्ये किंवा भांड्यात ढोकळा करायला ठेवावा वीस मिनिटं ठेवावे
- 6
तोपर्यंत एक पतडका घेऊन त्यात तेल घालावे मोहरी जीरे घालावे तडतडले की त्यात हिंग घालावा मिरची घालून घ्यावी कढीपत्ता घालावा गॅस बंद करून घ्यावादोन चमचे पाणी घालावे
- 7
वीस मिनिटांनी सुरीच्या साह्याने चेक करून बघावे ढोकळा शिजला का ढोकळ्याचे पीठ शिजल्यानंतर त्यावर तडका द्यावा
- 8
सुरीने ढोकळ्याचे काप आकार कापून घ्यावे
- 9
- 10
Top Search in
Similar Recipes
More Recipes

























टिप्पण्या