शेवया गाजर कस्टर्ड डेझर्ट (Vermicelli Carrot Custard Dessert Recipe In Marathi)

#CookpadTurns6
Cookpad... सहावा वर्धापनदिन साजरा करताना पार्टी तो बनती है... तेव्हा काहीतरी स्पेशल बनविणे ओघानेच आले...
खरे तर हे" स्पेशल काहीतरी" बनविण्यासाठी जो कॉन्फिडन्स , आत्मविश्वास Cookpad ने दिला त्याला तोड नाही.
घरच्या स्वयंपाका पुरते मर्यादित असलेल्या माझ्यासारख्या स्त्रीला हा आत्मविश्वास दिला, या बद्दल धन्यवाद Cookpad..
आपल्याही नावामागे कधीतरी chef अशी पदवी, निदान आपल्या परीवरापुरती, लागेल, याचा स्वप्नातही विचार केला नव्हता..
आज Cookpad मुळे, स्वतःमध्ये झालेला बदल पहिला, की विश्र्वासच बसत नाही..
किचन मध्ये जाण्याचा कंटाळा करणारी मी, आता काय नवे करता येईल, नवे शिकता येईल, याचाच विचार करते, ह्यातच सर्व काही आले..
तेव्हा पुन्हा एकदा Cookpad आणि संपूर्ण टीमला, सहाव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..
आणि या celebration साठी बनवले आहे, पौष्टिक आणि स्वादिष्ट Vermicelli Carrot Custard Dessert..

कुकिंग सूचना
- 1
सुरुवातीला सर्व सामग्री एकत्र ठेवावी.
- 2
गॅसवर एका पॅनमध्ये तूप टाकावे. तूप पातळ झाल्यावर त्यात शेवया टाकाव्यात.
- 3
शेवया छान सोनेरी झाल्या की त्यात दूध पावडर टाकावे. मिक्स करावे. आता त्यात पिठीसाखर टाकावी.
- 4
चांगले मिक्स केल्यानंतर गॅस बंद करावा. आणि बाजूला ठेवावे. एका बाऊलमध्ये पाव कप दूध घेऊन त्यात कॉर्नफ्लॉवर आणि कस्टर्ड पावडर टाकून मिक्स करून घ्यावे.
- 5
हे करेपर्यंत एका बाजूला भांड्यात गॅसवर दूध ठेवून त्याला उकळी आणावी. दूध उकळल्यानंतर त्यात तयार केलेले कॉर्नफ्लॉवर आणि कस्टर्ड पावडर चे मिक्स हळूहळू टाकून ढवळावे. दोन मिनिट शिजवल्यानंतर त्यात साखर टाकावी आणि पुन्हा शिजू द्यावे.
- 6
आता त्यात इसेन्स टाकावा आणि थोडे घट्ट झाल्यावर गॅस बंद करावा. आता आपले डेझर्ट सेट करण्यासाठी गाजराचा शिरा कस्टर्ड आणि शेवया तयार आहेत.
- 7
Dessert set करण्यासाठी एका ट्रे घ्यावा. त्यात सुरवातीला, तूप लावून घ्यावे. नंतर त्यात अर्ध्या शेवया पसरवून टाकाव्यात. एकाद्या वाटीने त्या दाबून घ्याव्यात. त्यानंतर त्यावर गाजराचा हलवा एकसारखा पसरवून घ्यावा. आता त्यावर custard पसरवून घ्यावे.
- 8
सर्वात शेवटी पुन्हा एकदा भाजलेल्या शेवया पसरवून घ्याव्यात. त्यावर आवडीनुसार सुकामेवा आणि रंगीत sprinkler टाकून सजावट करावी. त्यानंतर सेट होण्यासाठी हा ट्रे फ्रिझर् मध्ये 1 ते दीड तासाकरिता ठेवावा.
- 9
दीड तासाने काढून, सुरीच्या साहाय्याने कापून घ्यावे.
- 10
अणि छान थंडगार, सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व्ह करावे, स्वादिष्ट, शेवयांचे, गाजर हलवा घालून केलेले Vermicelli Carrot Custard Dessert....
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)