मराठवाडा स्पेशल सुशीला (Marathwada Special Sushila Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी मराठवाडा स्पेशल सुशीला ही रेसिपी पोस्ट करत आहे.

मराठवाडा स्पेशल सुशीला (Marathwada Special Sushila Recipe In Marathi)

#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी मराठवाडा स्पेशल सुशीला ही रेसिपी पोस्ट करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 - 40 मिनिटे
तीन
  1. 2 मेजरिंग कप कुरमुरे
  2. 1 मेजरिंग कप बारीक चिरलेला कांदा
  3. 1/4 मेजरिंग कप भाजकी चिवडा डाळ
  4. 1/4 मेजरिंग कप शेंगदाण्याचे कूट
  5. 1/4 चमचाहिंग
  6. 1/4 चमचा हळद
  7. 2-3हिरव्या मिरच्या
  8. 1/2 चमचाजीरे
  9. 1/2 चमचा मोहरी
  10. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
  11. 2 टेबलस्पूनतेल
  12. 7-8कडिपत्ता पाने
  13. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

35 - 40 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका बाउल मध्ये 2 मेजरिंग कप कुरमुरे घेतले. मग कुरमुऱ्यामध्ये पाणी घालून 1 मिनिटांनी पाणी काढून टाकले.

  2. 2

    मग 1/4 कप मेजरिंग कप चिवड्याची डाळ खलंबत्यामध्ये जाडसर कुटून घेतलीं.

  3. 3

    नंतर एका कढईत 2 चमचे तेल घालून ते चांगले गरम झाल्यावर, त्यात 1 चमचा जीरे, 1चमचा मोहरी ते चांगले तडतडल्यावर त्यात 1/4 चमचा हिंग, 1 मेजरिंग कप बारीक चिरलेला कांदा, 7-8 कडिपत्ता पाने, 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या. आणि कांदा सोनेरी रंगावर परतून घेतले.

  4. 4

    मग त्या फोडणी मध्ये 1/4 चमचा हळद घालून ती चांगली मिक्स करून घेतली. नंतर त्यात पाणी निथळून घेतलेले कुरमुरे घालून ते चांगले परतून घेतले.

  5. 5

    नंतर खलबत्यामध्ये कुटून घेतलेली 1/4 मेजरिंग कप चणाडाळीची भरड, 1/4 मेजरिंग कप शेंगदाण्याचे कुट, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतले.

  6. 6

    मग कढईवर झाकण ठेवून एक वाफ आल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मराठवाडा स्पेशल सुशीला हा चटपटीत, हलका फुलका झटपट होणारा नाष्टा सर्व्ह करण्यासाठी वरून लिंबाचा रस घालून खाण्यासाठी तयार आहे. हा नाष्टा खूप सुंदर लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Similar Recipes