साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)

साबुदाणा खिचडी आपण सर्वच करतो. पण उपास असताना मला उपासाचा खल्ल पित्त होतं म्हणून मी कमी दाण्याचा कूट वापरून नेहमीच अशी खिचडी करते.
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
साबुदाणा खिचडी आपण सर्वच करतो. पण उपास असताना मला उपासाचा खल्ल पित्त होतं म्हणून मी कमी दाण्याचा कूट वापरून नेहमीच अशी खिचडी करते.
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा दोन-तीन पाण्याने धुऊन घ्यायचा आणि पाच ते सहा तास भिजवायचा सकाळी करायचं असेल तर रात्री भिजवला तर जास्ती चांगला. साबुदाणा भिजला की त्याच्यात अर्धा वाटी दाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, साखर घालावी एकत्र मिक्स करून घ्याव.
- 2
बटाटे किसून घ्यावे आणि पाण्याने किस धुऊन घ्यावा. एका कढईत तूप घालून त्यात तूप गरम झालं की जिरं मिरची आणि किसलेला बटाट्याचा कीस घालावा
- 3
किस थोडा शिजला की त्यात साबुदाणा घालावा आणि छान परतून दणदणीत वाफ येऊ द्यावी वरतून लिंबू पिळावे आणि खिचडी गरम गरम खायला द्यावी.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या