मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

या सिझन मध्ये हिरवा मटार भरपूर मिळतो.
त्यामुळे आज मटारच्या करंज्या करून बघितल्या. खूप छान झालेल्या. तुम्हीही नक्की करून बघा.

मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi)

या सिझन मध्ये हिरवा मटार भरपूर मिळतो.
त्यामुळे आज मटारच्या करंज्या करून बघितल्या. खूप छान झालेल्या. तुम्हीही नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४-५ जणांसाठी
  1. सारणाचे साहित्य
  2. 1 कपहिरव्या मटारचे दाणे
  3. 3/4 कपओल्या नारळाचा चव
  4. 4-5हिरव्या मिरच्या
  5. 1 इंचआलं
  6. 1/2 टीस्पूनसाखर
  7. 1/2लिंबाचा रस
  8. 1/2 टीस्पूनजीरे
  9. 1 टीस्पूनतेल
  10. पारीचे साहित्य
  11. 1 कपगव्हाचे पीठ
  12. 3 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  13. 2 टेबलस्पूनबेसन पीठ
  14. १/८ टीस्पून साखर
  15. चवीप्रमाणे मीठ
  16. पिठाची मूठ होईल एवढे तेलाचे मोहन
  17. गरजेप्रमाणे पाणी
  18. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    एका कढईत १/८ टीस्पून तेल घालून त्यावर मटारचे दाणे घालून वाफवून घेणे.२-३ मिनिटे. मटार थंड करत ठेवणे.

  2. 2

    मिक्सरच्या‌ भांड्यात घालून ओबडधोबड वाटून घेणे. फोडणीचे साहित्य घेणे. त्याच कढईत पुन्हा उरलेले तेल घालून घेणे. जीरे घालून परतणे.

  3. 3

    आलं, हिरवी मिरची घालून १ ‌मिनिटभर परतणे. ओल्या खोबऱ्याचा कीस घालून परतणे.

  4. 4

    वाटून घेतलेला मटारचे दाणे घालून व्यवस्थित परतून घेणे. साखर व चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करावे. झाकण ठेवून एक वाफ काढून घेणे.

  5. 5

    गॅस बंद करून घेणे वरून लिंबाचा रस पिळून घेणे व व्यवस्थित मिक्स करून घेणे. तयार झालेले सारण थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देणे.
    एका बाऊलमध्ये गव्हाचे, तांदळाचे, बेसन पीठ घेणे.

  6. 6

    साखर व चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेणे. तेलाचे मोहन घालून व्यवस्थित पिठाला चोळून घेणे.

  7. 7

    थोडे थोडे पाणी घालून एकदम घट्ट पीठ मळून घेणे. दहा-पंधरा मिनिटे झाकून बाजूला ठेवणे.

  8. 8

    नंतर बत्याने पीठ चेचून घेणे. पुन्हा एकदा व्यवस्थित पीठ मळून त्याचे गोळे करून घेणे. तयार गोळ्यांच्या हव्या त्या आकाराच्या पुऱ्या लाटून घेणे. त्यावर चमच्याने मिश्रण घालून घेणे. बाजूच्या कडेने पाण्याचे बोट फिरवून घेणे. दुसरी बाजू त्यावर घालून व्यवस्थित दाबून घेणे. फिरकीने कडा कापून घेणे.

  9. 9

    अशाप्रकारे सर्व करंज्या करून घेणे. गॅसवर कढईत तेल घालून तापत ठेवणे. तेल चांगले तापवून, गॅस मध्यम आचेवर ठेवावा.
    (टीप:- तळताना गॅस जास्त मोठाही नको व मंदही नको मध्यम आचेवर असू द्यावा.)
    कढईत बसतील तेवढ्या करंज्या घालून व्यवस्थित दोन्ही बाजूने तळून घ्याव्यात.

  10. 10

    अशाप्रकारे सर्व करंज्या तयार करून घेणे.
    गरमागरम खाण्यासाठी खूप छान लागतात या करंज्या.

  11. 11

    पारीसाठी तुम्ही मैदा व बारीक रवा ही वापरु शकता. पारी दोन्ही प्रकारेही करता येतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes