व्हेजी चिजी ब्रेड रोल्स (Veggie Cheesy Bread Rolls Recipe In Marathi)

व्हेजी चिजी ब्रेड रोल्स (Veggie Cheesy Bread Rolls Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सगळ्या ब्रेड स्लाईसेसच्या कडा काढून घेतल्या. नंतर एक एक करून सगळे स्लाईस लाटण्याने लाटून घेतल्या.
- 2
नंतर एका फ्राय पॅन मधे तेल व बटर तापवून त्यांत आल, लसूण व मिरच्या परतवून घेतले. नंतर त्यावर कॉर्न्स, फरसबी, गाजर, शिमला मिरची, कांदा घालून छान परतवून घेतले.नंतर त्यांत मिरी पूड व ऑरीगॅनो व चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस एकजीव करून घेतले.
- 3
मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यांत किसलेले चीज घालून सर्व
एकजीव केले व त्याचे लांबट आकाराचे गोळे करून घेतले. - 4
नंतर एका पावाच्या स्लाईस वर एक गोळा ठेवून कॉर्नफ्लोअरच्या स्लरीने त्याच्या कडा बंद करून रोल्स तयार करून घेतले.
- 5
नंतर तयार रोल स्लरीमधे बुडवून घेतले. नंतर ब्रेडक्रम्समधे घोळवून घेतले व फ्राय पॅन मधे तेल सोडून शॅलोफ्राय करून घेतले.
- 6
गरमागरम व्हेजी चिली ब्रेड रोल्स पुदिन्याची चटणी व केचप सोबत सर्व्ह केले. सोबतच वाफाळलेला चहा सुद्धा.
Similar Recipes
More Recipes
















टिप्पण्या