एग - खिमा रोल्स (Egg Keema Recipe In Marathi)

#PR
पार्टी स्पेशल रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम खिम्याला हळद, संडे मसाला, आल लसूण मिरची व खडा मसाला वाटून बनवलेली पेस्ट व मीठ घालून खिमा २० मिनीटे मॅरिनेट करून ठेवला.
- 2
एका भांड्यात तेल तापवून त्यांत लवंग, वेलची, तमालपत्र, दालचिनी व मिरे छान सुगंध येईपर्यंत परतवून घेतले. नंतर त्यांत कांदा छान गुलाबी रंगावर परतवून घेतला. नंतर त्यांत मॅरिनेट केलेला खिमा घालून परतवून घेतला व त्यांत कपभर पाणी घालून खिमा शिजवून घेतला. व कोरडा करून घेतला.
- 3
बटाटे उकडून मॅश करून घेतले व त्यांत ब्रेडचा चुरा वआलं लसणाची पेस्ट व कोथिंबीर घालून गोळा मळून घेतला.
- 4
अंडी उकडून दोन भागात चिरून घेतली व त्यातील पिवळा बलक खिम्यामधे एकजीव करून घेतले.
- 5
नंतर बटाट्याची पारी करून त्यांत अंड ठेवून त्यावर खिम्याचा गोळा करून ठेवला व बटाट्याचे आवरण करून गोळा तयार करून घेतला.
- 6
१-१ करून पॅटीस कॉर्नफ्लोअरच्या पेस्ट मधे बुडवून नंतर ब्रेडच्या चु-यामधे घोळवून घेतले. परत पेस्ट मधे बुडवून परत ब्रेडच्या चु-यामधे घोळवले व गरम तेलातून सोनेरी रंगावर तळून घेतले
- 7
नंतर तयार झालेले पॅटीस टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह केले.
Top Search in
Similar Recipes
More Recipes
- रबडी शाही तुकडा (Rabdi Shahi Tukda Recipe In Marathi)
- बोरांची चटणी (Borachi Chutney Recipe In Marathi)
- पौष्टिक - ओली शाही भेळ / शाही ओली भेळ (Oli Bhel Recipe In Marathi)
- हिरव्या मूगडाळीचे पौष्टीक आप्पे (Hirvya Moong Daliche Appe Recipe In Marathi)
- पाणी पुरीचे चटपटीत पाणी / चटपटीत आंबट गोड चटणी (Panipurichi God Chutney Recipe In Marathi)













टिप्पण्या