फ्लाॅवर बटाटा भाजी (Flower Batata Bhaji Recipe In Marathi)

#JLR
बटाट्यांसोबत फुलकोबीच्या तुर्ऱ्यांचे हे मिश्रण सर्वांनाच आवडते. ही भाजी साधारणपणे प्रत्येक भारतीय घरात थोडाश्या वेगवेगळ्या पद्धतीने लंच किंवा डिनर साठी तयार केली जाते. डब्यासाठी होणारी झटपट चविष्ट, पौष्टिक आणि रिच टेस्ट असलेली भाजी...
फ्लाॅवर बटाटा भाजी (Flower Batata Bhaji Recipe In Marathi)
#JLR
बटाट्यांसोबत फुलकोबीच्या तुर्ऱ्यांचे हे मिश्रण सर्वांनाच आवडते. ही भाजी साधारणपणे प्रत्येक भारतीय घरात थोडाश्या वेगवेगळ्या पद्धतीने लंच किंवा डिनर साठी तयार केली जाते. डब्यासाठी होणारी झटपट चविष्ट, पौष्टिक आणि रिच टेस्ट असलेली भाजी...
कुकिंग सूचना
- 1
फ्लाॅवरचे तुरे बारीक आकारात कापून घ्यावे. त्यांना दहा मिनिटे गरम पाण्यात भिजत ठेवावे. त्यामुळे त्यातील किड वगैरे काही असेल तर ते मरून जातात. त्यानंतर २ चमचे तेलामध्ये फ्लाॅवर आणि बटाट्याचे तुकडे थोडे लालसर फ्राय करून घ्यावेत त्यामुळे भाजीला मस्त खमंगपणा येतो.
- 2
काजू,सुकं खोबऱ्याचा कीस, आलं लसूण यांची थोडसं पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घ्यावी.
- 3
कढईत २ टेस्पून तेल गरम करून गरम करावे त्यात मोहोरी, जीरे, हिंग याची फोडणी करून त्यामध्ये कांदा घालून, कांदा गुलाबीसर होईस्तोवर परतावे. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालून परतून घेऊन लाल मिरची पावडर, घरचा मसाला, गरम मसाला आणि हळद हे सर्व टाकून मसाला परतावा त्यानंतर त्यात काजू खोबऱ्याची तयार केलेली पेस्ट घालून मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यावे.
- 4
आता त्यामध्ये परतून घेतलेले फ्लाॅवर बटाटा घालून भाजी मसाल्यामध्ये व्यवस्थित परत एकदा नीट परतून घ्यावी. कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटे भाजी शिजू द्यावी.
- 5
वाटणाचे पाणी आणि एक्स्ट्रा एक कप पाणी घालावे. (भाजीला ग्रेव्ही कितपत हवी तितके त्यामध्ये पाणी घालावे.) कसुरी मेथी आणि मीठ घालून मध्यम आचेवर कढईवर झाकण ठेवून बटाटा आणि फ्लॉवर शिजू द्यावा. साधारण ८ ते १० मिनीटे लागतील शिजायला. भाजी शिजत असताना मधेमधे ढवळावे.
- 6
थोडी लतथपीत अशी फ्लावर बटाट्याची भाजी तयार होते. मस्त खमंग डब्यासाठी रुचकर अशी भाजी बनते. कोथिंबीरीने सजवून चपाती किंवा रोटी बरोबर फ्लाॅवर बटाट्याची भाजी सर्व्ह करावी.
Similar Recipes
More Recipes
















टिप्पण्या