तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)

#TGR
#मकरसंक्रांती_स्पेशल_रेसिपीस
#तिळगुळाचे_लाडू
#तिळगुळ_घ्या_आणि_गोड_गोड_बोला
थंडीच्या दिवसात स्निग्ध पदार्थ बनवून खावे असे म्हणतात. इवलेसे दिसणारे तिळ हे उष्ण असतात आणि थंडीमधे तिळ आणि गुळ दोन्ही पदार्थ अंगात उष्णता निर्माण करतात. त्याचप्रमाणे शेंगदाणे, सुकं खोबरं यामुळे पण शरीरात उत्साह आणि ताकद निर्माण होते. या सर्व पदार्थांचा गोडवा अविट आहे, ज्यामुळे शरीरात उत्साह येतो.
#महत्वाची_टिप: तिळगुळाचे मिश्रण गरम असताना लगेचच लाडू वळावेत कारण मिश्रण गार झालं तर तिळगुळ लाडू वळायला कठीण होते. हाताला अगदी थोडंसं थेंबभर पाणी लावून मग लाडू वळले तर हात भाजत नाहीत. आणि तिळगुळ लाडू वळताना लाडवाचे पातेले एका गरम पाण्याच्या पातेल्यावर ठेवून मग लाडू वळावेत म्हणजे शेवटचा लाडू वळेपर्यंत लाडवाचे मिश्रण घट्ट होत नाही.

कुकिंग सूचना
- 1
तिळ मंद आचेवर परतून भाजावे. सुकं खोबरं किसून घेऊन मग ते पण मंद आचेवर परतून खरपूस भाजून घ्यावे.
- 2
शेंगदाणे खरपूस भाजून मग जाडसर वाटून घ्यावे. गुळ बारीक चिरून घ्यावा.
- 3
जाड बुडाच्या पातेल्यात दोन टेबलस्पून तूप घालावे. तुपामुळे तिळाचे लाडू छान चकचकीत दिसतात. तूपावर बारीक चिरलेला गुळ घालून तो वितळून पातळ करून घ्यावा. मग त्यात भाजलेले तीळ, भाजलेलं सुकं खोबरं, वेलची पूड आणि फुटाणे डाळं घालावे.
- 4
मग भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालून हे सगळे पदार्थ वितळलेल्या गुळामधे घालून मग गॅस बंद करून तिळगुळाचे मिश्रण चांगले मिक्स करावे.
- 5
तिळगुळाचे मिश्रण गरम असताना लगेचच लाडू वळावेत कारण मिश्रण गार झालं तर तिळगुळ लाडू वळायला कठीण होते. हाताला अगदी थोडंसं थेंबभर पाणी लावून मग लाडू वळले तर हात भाजत नाहीत. आणि तिळगुळ लाडू वळताना लाडवाचे पातेले एका गरम पाण्याच्या पातेल्यावर ठेवून मग लाडू वळावेत म्हणजे शेवटचा लाडू वळेपर्यंत लाडवाचे मिश्रण घट्ट होत नाही. पहिले तिळगुळाचे लाडू बनवून देवाला नैवेद्य अर्पण करावा.
- 6
तिळगुळ लाडू एका प्लेटमधे छान सजवून सर्वांना लाडू देताना "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला" असं म्हणावे.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या