बिना पाकाचे तिळाचे मऊसूत लाडू (Bina Pakache Tilache Ladoo Recipe In Marathi)

#TGR संक्रात म्हणजे तीळाचे लाडू.. मग ते प्रत्येक वेळी आपण एकाच प्रकारचे लाडू करतो. पण ह्या वेळी खास माझ्या बाळासाठी त्याला ही लाडू चा स्वाद घेता यावा यासाठी माझा हे मऊसूत लाडू बनवण्यासाठीचा हा प्रयत्न...

कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅस मंद आचेवर ठेवून त्यावर एका कढईत २ कप तीळ घेऊन सोनेरी सर होईपर्यंत परतवून चांगले भाजून घ्या. नंतर हे तीळ थंड होण्यासाठी एका ताटात काढून घ्या.
- 2
तोपर्यंत १ कप शेंगदाणे कढईत चांगले खरपूस भाजून घ्या व थोडे थंड होऊन त्याची साली काढून मिक्सरला जाडसर भरडून घ्या. आता थंड झालेल्या तीळातील थोडे तीळ बाजूला काढून सर्व तीळ मिक्सरला जाडसर पूड करून घ्या.
- 3
नंतर एका परातीत सव्वा कप साधा गूळ किसून त्यात बारीक पावडर केलेले तीळ, शेंगदाण्याचा कूट, वेलची पूड, जायफळ (थोडे किसून) बदाम बारीक तुकडे, तूप घालून सर्व मिश्रण एकजीव करून थोडे बाजूला ठेवलेले तीळ मिक्स करा आणि हाताला तूप लावून हया मिश्रणाचे लाडू बांधून घ्या.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या