बिना पाकाचे तिळाचे मऊसूत लाडू (Bina Pakache Tilache Ladoo Recipe In Marathi)

#TGR संक्रात म्हणजे तीळाचे लाडू.. मग ते प्रत्येक वेळी आपण एकाच प्रकारचे लाडू करतो. पण ह्या वेळी खास माझ्या बाळासाठी त्याला ही लाडू चा स्वाद घेता यावा यासाठी माझा हे मऊसूत लाडू बनवण्यासाठीचा हा प्रयत्न...
बिना पाकाचे तिळाचे मऊसूत लाडू (Bina Pakache Tilache Ladoo Recipe In Marathi)
#TGR संक्रात म्हणजे तीळाचे लाडू.. मग ते प्रत्येक वेळी आपण एकाच प्रकारचे लाडू करतो. पण ह्या वेळी खास माझ्या बाळासाठी त्याला ही लाडू चा स्वाद घेता यावा यासाठी माझा हे मऊसूत लाडू बनवण्यासाठीचा हा प्रयत्न...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅस मंद आचेवर ठेवून त्यावर एका कढईत २ कप तीळ घेऊन सोनेरी सर होईपर्यंत परतवून चांगले भाजून घ्या. नंतर हे तीळ थंड होण्यासाठी एका ताटात काढून घ्या.
- 2
तोपर्यंत १ कप शेंगदाणे कढईत चांगले खरपूस भाजून घ्या व थोडे थंड होऊन त्याची साली काढून मिक्सरला जाडसर भरडून घ्या. आता थंड झालेल्या तीळातील थोडे तीळ बाजूला काढून सर्व तीळ मिक्सरला जाडसर पूड करून घ्या.
- 3
नंतर एका परातीत सव्वा कप साधा गूळ किसून त्यात बारीक पावडर केलेले तीळ, शेंगदाण्याचा कूट, वेलची पूड, जायफळ (थोडे किसून) बदाम बारीक तुकडे, तूप घालून सर्व मिश्रण एकजीव करून थोडे बाजूला ठेवलेले तीळ मिक्स करा आणि हाताला तूप लावून हया मिश्रणाचे लाडू बांधून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तिळाचे मऊसूत लाडू (Tilache Soft Ladoo Recipe In Marathi)
#TGRमकर संक्रांति रेसिपी#मकर संक्रात#मऊ#तिळ#लाडू#तिळ गूळाचे लाडू#गूळ Sampada Shrungarpure -
-
-
तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGRहिवाळ्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या वेळी तिळ लाडू दिले जातात. या उत्सवादरम्यान ते मित्र आणि कुटुंबामध्ये देखील वितरित केले जाते. Vandana Shelar -
तिळाचे लाडू (Tilache Ladoo Recipe In Marathi)
#TGRमकरसंक्रांत स्पेशल रेसिपीकमी साहित्यात झटपट होणारे हे लाडू आहे.*ही माझी 601 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
मऊसूत तिळगुळ लाडू (teelgud ladoo recipe in marathi)
#cooksnapमऊसूत तिळगुळ लाडूDeepti Padiyar यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे...मी यात जायफळ ही टाकले आहे. याआधी मी पाकातले लाडू केले आहेत. मला ही रेसिपी खूप आवडली...लाडू होतात ही झटपट आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात... Sanskruti Gaonkar -
तिळाचे लाडू(मकर संक्रांत स्पेशल) (Tilache Ladoo Recipe In Marathi)
#TGR मकर संक्रांत या सणाला तिळाचे लाडू अनेक जण बनवतात. तिळामध्ये कॅल्शियम लोह मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे दात हाडे मजबूत होण्यास मदत होते.मुखवास म्हणूनही बडिशेप आणि तिळाचे सेवन करावे. आशा मानोजी -
तिळाचे लाडू (tilache laddu recipe in marathi)
तीळ हे उष्ण आणि तेलकट असतात त्यामुळे थंडीमध्ये त्याचा आहारात मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो तिळाचे लाडू हे बनवणे अतिशय सोपे आहेत अगदी लहान मुलेही ते बनवू शकतात चला तर हे झटपट बनणारे लाडू आपणही बनवूयात Supriya Devkar -
खमंग मऊसूत तिळगुळ लाडू (teelgud ladoo recipe in marathi)
#मकरहे लाडू बिनपाकाचे आणि झटपट तयार होतात. हे लाडू पाकाच्या लाडू पेक्षा खूप रूचकर लागतात.माझ्या सासऱ्यांना असेच मऊसूत लाडू खायला आवडतात. म्हणून हे लाडू खास त्यांच्यासाठी...😊😊 Deepti Padiyar -
तिळाचे मोदक /तिळकुंद मोदक (tilache modak recipe in marathi)
#EB12#W12#तिळाचेमोदकगणपतीच्या भक्तांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सणांपैकी एक म्हणजे माघी गणेश जयंती. गणेश जयंती म्हणजे गणपतीचा जन्मदिवस. भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणे माघी गणेश जयंती गणेशभक्त उत्साहाने साजरी करतात.गणपतीला तिळाचे लाडू अथवा तिळाचे मोदक या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखविला जातो.यालाच तीळकुंद मोदक असेही म्हणतात. Deepti Padiyar -
बिना पाकाचे रवा लाडू (Bina Pakache Rava Ladoo Recipe In Marathi)
#md मदर्स डे चॅलेंजआईच्या हातचं. रेसिपी :1आईच्या हातच्या खूप रेसिपी रेसिपी आवडतात.तिलाही वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात. भाताची खीर, डिंकाचे लाडू, सजोरी, शिरा,बदामाचा शिरा,हे पदार्थ मला आवडतात.त्यातील भाताची खीर, शिरा डिंकाचे लाडू ह्या रेसिपी पोस्ट केल्या आहेत. हे बिना पाकाचे लाडू आहेत. तोंडात टाकताच विरघळणारे.मला व माझ्या मोठ्या मुलीला हे लाडू फार आवडतात. Sujata Gengaje -
-
बिना पाकाचे तीळगूळ लाडू,वडी (bina pakache tilgud ladoo recipe in marathi)
#मकर ... #मकर_संक्रांत_स्पेशल... झटपट आणी पाक न करता बनणारे तीळगूळ लाडू व वडी ...याचीच आपण तीळगूळ पोळी पण बनवू शकतो ... Varsha Deshpande -
-
तिळाचे लाडू (tilache laddu recipe in marathi)
#मकर #तिळाचे लाडू. हा लाडू मी माझ्या सासू सासरे यांच्या साठी स्पेशल केला. हा लाडू खूप मऊ असल्या मुळे वयस्कर माणसे खाऊ शकतात. संक्रात येण्याच्या पूर्वी माझे सासरे ८४ वर्षाचे म्हणाले की जरा मऊच लाडू कर, म्हणून खास त्यांच्या साठी मी हा तीळ कुटाचे लाडू केले. गेले काही वर्षे चिक्की चा गुळ घालुन लाडू करायची. यंदा पण चिक्कीच्या गुळाचे लाडू मुलासाठी केले. पण मऊ लाडू ही केले. सासरे भारी खुश झाले आणि त्यांचा आनंद पाहून माला ही खूप समाधान वाटले. मग चालातर तुम्ही ही या रेसिपी चा आनंद घ्या. Sujata Kulkarni -
काळ्या तीळाचे लाडू (tilache ladoo recipe in marathi)
#लाडू ...लाडू चे कीती सगळे प्रकार आहेत ..नेवेद्यात प्रत्येक देवाला आवणारे पण वेगवेळे लाडू आहेत ....हनूमानजीला बूंदिचा ..तर माहालक्ष्मीला रव्या बेसनाचा.. असे अनेक प्रकारचे आणी शनीला काळे तीळ , काळे ऊडदाचे ...तर मी हे शनीमंदीरात वाटायला म्हणून केलेले काळ्या तीळाचे लाडू .... Varsha Deshpande -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#thanksgiving सुजाता ताई यांची लाडू ची रेसिपी try करून पाहिली. झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. खूप छान झाले लाडू. Priya Sawant -
तिळगुळाचे लाडू (tilgulache ladoo recipe in marathi)
#sankrantiमऊसूत पौष्टिक तिळगुळ लाडूची कृती पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
-
स्वादिष्ट तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR... संक्रांत आणि तिळगुळाचे नाते सर्वश्रुत आहे. यावेळी तिळगुळाचे लाडू, वड्या, पोळ्या प्रत्येक घरीच तयार केल्या जातात. मी पण केल्या आहेत सोप्या पद्धतीने, तिळगुळ वड्या.. Varsha Ingole Bele -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 नैवेद्य उकडीचे मोदक गणपती साठी खास केलेला माझा प्रयत्न. माझ्या सासरी तळलेले मोदक केले जायचे जास्त. पण मला उकडीचे मोदक पण खूप आवडत. म्हणतात ना स्वतःला आवडत तर शिकायच. आणि माझ्या सासर्यांच्या पण आवडीचे म्हटला प्रयत्न तर करू. आता मनासारखा नैवेद्य दाखवल्या सारखं वाटतं. तस खूप जन करतात पण प्रत्येकाला आपली रेसिपी खास. पाहुया उकडीचे मोदक. 🌰 Veena Suki Bobhate -
-
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
लाडू हा पदार्थ भारताच्या कानाकोपऱ्यात केला जातो.दिवाळी असो लग्न समारंभ असो प्रत्येक वेळी लाडू हमखास केले जातात.लाडू चे विविध प्रकार आहेत,बेसन लाडू,रवालाडू,खोबर लाडू,ड्राय फ्रूट लाडू,पिठी लाडू,हे व असे विविध प्रकारचे लाडू केल्या जातात.तर आज आपण बेसन लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत. MaithilI Mahajan Jain -
मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)
आपण शेंगदाण्याचे लाडू करतो.त्यात जर मखाना घातला तर हे लाडू खूप आरोग्यवर्धक होतात. Archana bangare -
पोहे डाळव्याचे लाडू (pohe dalva ladoo recipe in marathi)
मला हे लाडू माझ्या आज्जीसासुने शिकवले आहेत.थोडी वेगळी रेसिपी आहे म्हणून मी ते केले.Rutuja Tushar Ghodke
-
तिळाचे लाडू (teelache ladoo recipe in marathi)
#मकर #Post2 हे लाडू महाराष्ट्रात संक्रांतीला घराघरातून आवर्जून करण्यात येतात सगळ्यांचे एकदम आवडते. Hema Wane -
-
पौष्टिक अळीव लाडू (paushtik adiv ladoo recipe in marathi)
#GA4#week14#कीवर्ड- लाडू.अळीवाचे लाडू आपण नेहमी ,नारळाच्या पाण्यात किंवा फळांच्या रसामध्ये भिजवून करतो. पण हे लाडू फक्त ३ दिवसच टिकतात. मी आज थोड्या वेगळ्या पद्धतीने हे लाडू तयार केले आहेत. खूपच झटपट होतात हे लाडू...😊 शिवाय महिनाभर टिकतात.अळीवाचे लाडू म्हणजे स्त्रीयांसाठी एक वरदानच आहे .अळीवामधे लोह, कॅल्शियम,फाॅलिक ,क जीवनसत्त्वासारखी पोषक घटक या अळीवामधे आहेत.रक्तशुद्धी करणाऱ्या घटकांमुळे अळीव हे, स्त्रीयांना उपयुक्त ठरते.बाळंतिणीसाठी तर हे अळीव खूपच फायदेशीर आहे. थंडीचे दिवस हे वर्षभराची ऊर्जा मिळवण्यासाठी आणि तब्येतीसाठी उत्तम मानले जातात. या काळात पौष्टिक गोष्टी खाल्ल्याने त्या अंगी लागतात. मुलांबरोबरच मोठ्यांनीदेखील या काळात पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे असते. या काळात खाल्लेल्या पदार्थाची उपयुक्तता पुढील वर्षभरासाठी पुरते.गूळ, खोबरे आणि अळिव घालून केलेले हे लाडू शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. Deepti Padiyar -
पोह्यांचे झटपट लाडू (pohyanche ladoo recipe in marathi)
#लाडूजन्माष्टमीला महाराष्ट्रात विविध प्रकारची पक्वान्न आणि नैवेद्य केले जातात. या अनेक पदार्थांमध्ये दूध,दही,लोणी यांचा वापर केला जातो. कारण भगवान कृष्णाचे बालपण गोकुळात गेले असल्यामुळे त्याला हे पदार्थ आवडतात. यासोबतच महाराष्ट्रात कोकणामध्ये जन्माष्टमीला गूळपोहे, दहीपोहे,आंबोळी आणि शेवग्याच्या पानांची भाजी हा खास पदार्थ देखील केला जातो. मी पोह्यांच्या लाडूबरोबर गूळपोह्यांचा पण नैवेद्य दाखवला. स्मिता जाधव -
More Recipes
टिप्पण्या