भंडारी स्टाईल पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi)

#LCM1 ही भंडारी स्टाईल भाजी मी वसई मध्ये एका समारंभात टेस्ट केली होती.. आणि ती मला आवडली ही होती.. त्यामुळे ती भाजी घरी येऊन आपण बनवून बघण्याचा आणि घरातल्या मंडळी ना बनवून देण्याचा माझा प्रयत्न....

कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यात सोललेल्या शेंगा दाणे, कापून घेतलेली वांगी, बटाटे चांगले धुवून घ्या. नंतर गॅस चालू करून त्यावर एका कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता,जीरे, हिंगाची फोडणी दया.
- 2
आता त्यात बारीक चिरलेला कांदा, तेलात फिरवून तो लालसर होईपर्यंत परतवून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, घालून परतवा तो नरम झाला की त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला घालून ते एकदा चमच्याने फिरवून त्यात धुवून घेतलेल्या भाज्या घाला. आणि तेलात चांगल्या परतवून घ्या. वरून भाज्या शिजण्यापुरते गरम पाणी घालून वरून झाकण ठेवून १०-१५ मिनिटे भाज्या शिजू दया.
- 3
नंतर झाकण काढून त्यात चवीनुसार मीठ घालून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गुळाचा छोटा तुकडा घालून भाजी मिक्स करून घ्या. वरून कसुरी मेथी भुरभुरा.
- 4
तयार भंडारी स्टाईल पावटयाच्या शेंगाची भाजी...
Similar Recipes
More Recipes
- बटर पनीर मसाला भाजी (Paneer Butter Masala Bhaji Recipe In Marathi)
- आलू लच्छा पराठा (Aloo Laccha Paratha Recipe In Marathi)
- मांदेली बोंबील फ्राय (Mandeli Bombil Fry Recipe In Marathi)
- हरयाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
- पावटा बटाटा रस्सा भाजी (Pavta Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)

टिप्पण्या