बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)

#LCM1 या थीम साठी मी माझी बाजरीच्या गोड कापण्या ही रेसिपी पोस्ट करत आहे.
बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1 या थीम साठी मी माझी बाजरीच्या गोड कापण्या ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाउल मध्ये 3/4 मेजरिंग कप गूळ बारीक चिरून घेतला. मग त्यात अर्धा मेजरिंग कप पाणी घालून, गूळ मिक्स करून घेतला. आणि 10 मिनिटे झाकून ठेवला. 10 मिनिटांनी गूळ चांगला वितळला. मग वितळलेला गूळ गाळून घेतला.
- 2
नंतर एका बाउल मध्ये 1.5 मेजरिंग कप बाजरीचे पीठ, 1/2 मेजरिंग कप गव्ह्याचे पीठ, 1 चिमूट मीठ, 1/2 चमचा तीळ, 1.5,चमचा वितळवून घेतलेले तूप घालून ते सर्व साहित्य चांगले मिक्स करून घेतले.
- 3
मग त्यात गाळून घेतलेलया गुळाचे थोडे थोडे पाणी घालून,पीठ तयार करून घेतले. पण जर पीठ कोरडे असेल तर त्यात, थोडे पाणी घालून पीठ 3-4 मिनिटे चांगले मळून घेतले.
- 4
नंतर पोळपाटावर थोडे तीळ पसरवून त्यावर पिठाचा गोळा दोन्ही बाजूने तीळ लावून घेतले. व थोडे पीठ घालून, पोळी लाटून घेतली. आणि सुरीने चौकोनी आकाराचे कापण्या कापून घेतल्या.
- 5
मग एका कढईत तेल घालून ते मध्यम गॅसवर मध्यम गरम झाल्यावर त्यात थोड्या कापण्या घालून तांबूस रंगावर तळून घेतलया. आणि पेपर नॅपकिन वर काढून घेतल्या.
- 6
अश्याच प्रकारे बाकीच्या कापण्या तळून घेतल्या. आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत आपल्या चविष्ट, कुरकुरीत बाजरीच्या कापण्या
Keywords
Similar Recipes
More Recipes

















टिप्पण्या