हांडवो (Handvo Recipe In Marathi)

तडका म्हणा किंवा फोडणी म्हणा...पदार्थाला खमंग फोडणी किंवा तडका बसला की पदार्थाची लज्जत न्यारीच होते..तेल,तूप व्यवस्थित तापायला हवे.. मोहरी जीरे हे तडक्यातील key ingredients...ते व्यवस्थित तडतडले पाहिजेत..हिंग ,मोहरी,जीरे न जळता फोडणी /तडका झाला तरच त्याचा खमंग दरवळ घरभर पसरतो आणि तो खमंग वास नाकातून सरळ मेंदूत जाऊन तरोताजा , happy वाल्या feeling येऊन आज क्या बन रहा है अशा आरोळ्या कानावर येतात...मग काय विचारता तो पदार्थ नंबर वन झालेलाच आहे म्हणून समजा आणि तिथल्या तिथे गट्टम झालाच म्हणून समजा..
जीवनाचं पण असच आहे नाही कां..जीवनाला पण असे खमंग तडके अधून मधून बसले की आयुष्य पण आपोआप सुगंधी,चवदार ,हवंहवंस होईल..Bore होणार नाही.. यासाठी सकारात्मक नजर हवी.गरम तेलात मोहरी जीरे पडल्यानंतरच खमंगपणा दरवळतो..त्याचप्रमाणे आयुष्यात कुठल्याही बाबतीत झोकून दिल्यावरच आयुष्य चवदार,खमंग होतं..बरोबर ना..
हो हो थांबते आता...चला तर मग आता वाट कसली बघताय.. उचला हांडवो पटापट 😀

कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करून घ्या.
- 2
आता एका वाडग्यामध्ये हांडवो मिक्स पीठ, घ्या. त्यामध्ये हिंग,हळद,मीठ,साखर,धणेपूड घाला आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या.
- 3
आता वरील मिश्रणात मिरच्या, आले,बारीक चिरलेली कोथिंबीर, मेथी,दही तेल घालून एकत्र करा आणि पाणी घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. गुठळ्या राहता कामा नयेत आणि दोन ते तीन मिनिटे हे मिश्रण झाकून ठेवा.
- 4
आता ह्या वरील मिश्रणात तीन ते चार टीस्पून पाणी घालून परत मिश्रण एकजीव करून घ्या.
- 5
आता एकीकडे पँन मध्ये तेल मोहरी, हिंग जीरे आणि तीळ घालून खमंग फोडणी करून घ्या.
- 6
आता या फोडणीवर वरील भिजवलेले पीठ घालून झाकण ठेवा आणि मंद आचेवर पाच ते सहा मिनिटे सोनेरी रंगावर शिजवून घ्या. जास्त वेळ शिजवू नये आणि तसेच गॅसची फ्लेम लो low ठेवावी नाहीतर हांडवो खालून जळतो.
- 7
आता हांडवो एका ताटात काढून घ्यावा आणि त्याच पॅनमध्ये थोडे तेल जीरे, हिंग मोहरी तीळ घालून खमंग फोडणी तयार करून घ्या आणि हांडवोची दुसरी बाजू देखील सोनेरी रंगावर फ्राय करुन घ्या.
- 8
- 9
तयार झाला आपला क्रिस्पी,खमंग हांडवो. पाच ते दहा मिनिटे गार करून घ्या.नंतर हव्या त्या आकारात वड्या पाडून वरुन कोथिंबीर घालून चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.
- 10
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (3)