गव्हाचे खारे कुरकुरे(Wheat Flour Kurkure Recipe In Marathi)

#HR1
होळी स्पेशल रेसिपीस
हा एक टी टाईम स्नॅक्स् प्रकार आहे.
नुसते ही खूप छान लागतात. प्रवासात नेण्यासाठी चांगले आहे.
गव्हाचे खारे कुरकुरे(Wheat Flour Kurkure Recipe In Marathi)
#HR1
होळी स्पेशल रेसिपीस
हा एक टी टाईम स्नॅक्स् प्रकार आहे.
नुसते ही खूप छान लागतात. प्रवासात नेण्यासाठी चांगले आहे.
कुकिंग सूचना
- 1
एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घेणे. त्यात सर्व मसाले घालून मिक्स करून घेणे. ओवा व कसुरी मेथी हातावर कुस्करून घालणे. म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो.
- 2
सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती तेल घालून सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घेणे.पिठाची मूठ तयार झाली पाहिजे.
- 3
थोडे-थोडे पाणी घालून चपातीला कणिक मळतो, त्यापेक्षा थोडीशी घट्ट कणिक मळून घेणे. गॅसवर कढईत तेल घालून, तापत ठेवणे.
- 4
पीठ एकदा व्यवस्थित मळून घेणे व त्याचे तीन उंडे तयार करून घेणे. किचन मधील कात्री घेऊन, हव्या त्या आकाराचे छोटे-छोटे तुकडे कात्रीने करून घेणे. तेल तापल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवावा. कढईत जेवढे बसतील, तेवढे कुरकुरे घालून घेणे.
- 5
सतत हलवत राहणे दोन्ही बाजूंनी छान लाल झाली ते काढून घ्यावे अशा प्रकारे सर्व कुरकुरीत तळून घेणे. *गरमागरम चहा सोबत हे कुरकुरे खूप छान लागतात. मैदाही घेऊ शकता. पण मी गव्हाच्या पिठाचे केले आहे.
Similar Recipes
More Recipes
















टिप्पण्या