पनीर दो प्याजा ढाबा स्टाईल

#रात्रीचे_जेवण_रेसिपीज
पनीर दो प्याजा ढाबा स्टाईल
पनीरचे आमच्या घराशी खूप घट्ट नातं आहे .पनीर टिक्का ,पनीर टिक्का मसाला, पनीर भुर्जी, पनीर बासुंदी, पनीर पकोडा, मटर पनीर ,रसगुल्ला, रसमलाई,अशा पनीरच्या एक ना दोन अनेक रेसिपीज माझ्या स्वयंपाक घरात सतत शिजत असतात किंबहुना फ्रिजमध्ये पनीरचा स्टॉक असतोच असतो. तर याच जात कुळी मधली रात्रीचे जेवण रेसिपीज या थीम साठी मी पहिल्यांदाच चमचमीत अशी ढाबा स्टाइल पनीर दो प्याजा ही भाजी करून आमचे सर्वांचे पनीर प्रेम आणखी एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न केलाय आणि तो अफलातून यशस्वी झालाय...😋😍 चला तर मग रेसिपीकडे

कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एके ठिकाणी जमवून घ्या. आता एका वाडग्यामध्ये पनीरचे चौकोनी तुकडे करून त्यामध्ये हळद, तिखट मीठ,काळी मिरी पावडर घालून व्यवस्थित एकजीव करा.पाच मिनिटे झाकून ठेवा.
- 2
आता एका कढईत तेल घालून तेल तापल्यावर मॅरीनेट केलेले पनीरचे चौकोनी तुकडे घालून व्यवस्थित परतून घ्या आणि बाजूला काढून ठेवा.
- 3
एका मोठ्या कढईमध्ये तेल तापल्यावर त्यामध्ये दालचिनी, लवंग,बडी विलायची, हिरवी वेलची,जिरे,तमालपत्र घालून परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या.
- 4
आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित परतून घ्या.त्यानंतर टोमॅटो पेस्ट घाला.मीठ घाला आणि झाकण ठेवून एक वाफ काढा.
- 5
नंतर वरील मिश्रणात धने पावडर,काश्मिरी लाल मिरची पावडर, हळद, काळी मिरी पावडर,मीठ घालून व्यवस्थित परता आणि झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत छान परतून घ्या.
- 6
आता वरील मिश्रणामध्ये दही घालून एकत्र करा.
- 7
नंतर त्यामध्ये पाणी घालून व झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवायला ठेवा.
- 8
आता एका पॅनमध्ये तूप तापले की त्यात जिरे, अख्खे धने,लसणाचे तुकडे,हिंग, दोन लाल सुक्या मिरच्या, दोन हिरव्या मिरच्या घालून व्यवस्थित परतून घ्या. नंतर त्यामध्ये कांद्याचे चौकोनी तुकडे, हिरव्या सिमला मिरचीचे चौकोनी तुकडे घालून व्यवस्थित एकजीव करा. नंतर त्यामध्ये धने पावडर,गरम मसाला पावडर,कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण हाय फ्लेमवर टॉस करून घ्या. आपल्याला कांदा जास्त शिजवायचा नाहीये.
- 9
- 10
नंतर उकळत्या ग्रेव्हीमध्ये मॅरीनेट केलेले पनीर घालून व्यवस्थित एकजीव करा आणि नंतर तयार केलेल्या कांद्या चा तडका या भाजीमध्ये घालून भाजी हलकेच ढवळून घ्या.
- 11
नंतर भाजीवर झाकण ठेवून एक वाफ काढा व त्यानंतर भरपूर कोथिंबीर घालून भाजी हलकेच एकत्र करा.
- 12
तयार झाली आपली ढाबा स्टाईल पनीर दो प्याजा वाली चमचमीत अशी भाजी... पोळी, फुलका, भात,फराठा,नान,रोटी याबरोबर ही भाजी सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या