कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य संकलित केले.
- 2
एका वाडग्यात दोन्ही पीठ, ओवा, तीळ, जीरे, खसखस, पापड खार, मीठ सर्व मिक्स केले. त्यात थोडे थोडे करत ३ मेजरींग कप पाणी घालून बॅटर बनवून घेतले. पाणी थोडे थोडे मिक्स केल्या मुळे त्यात गाठी होत नाहीत.
- 3
मग गॅसवर पातेल्यात ९ कप पाणी उकळले. त्याला उकळी आल्यावर त्यात पाण्यात पीठ हळू हळू ओतून दुसऱ्या हाताने सतत हलवत राहीले. म्हणजे ते गाठी न होता चांगले मिक्स होते.
- 4
ते पीठ शिजल्यावर सर्व बाजूंनी आत येऊन तिथे साय तयार होते. असे झाल्यावर १-२ मिनीटे उकळवून त्यात मिश्रणाचा थेंब पाण्यात टाकून पहावा तो न विरघळतात पाण्यावर तरंगतो म्हणजे पीठ तयार झाले.
- 5
आता प्लॉस्टीक पेपरवर पळीने लहान लहान पापड घातले. व दोन दिवस वाळवले. मग तेलात तळले.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16905968












टिप्पण्या