कुकिंग सूचना
- 1
कोबी किसून घ्या..एका मोठ्या बाऊल मध्ये किसलेला कोबी घेऊन त्यात आले, लसूण, हिरवी मिरची पेस्ट..लाल तिखट, हळद, हिंग, मीठ, जिरे, ओवा, कोथिंबीर घालून सर्व एकत्र करून घ्या..
- 2
आता बेसन पीठ व तांदळाचे पीठ घालून मिक्स करा.. मीठ घातल्यामुळे कोंबडीला पाणी सुटते त्यातच पीठ भिजले जाते..पाणी लागलेच तर एक टेबलस्पून घ्यावे.. सर्व मिश्रण एकजीव करावे. एक टीस्पून तेल घेऊन परत मळून घ्या व एका ताटाला तेल लावून घ्या..पीठाचा गोळा ताटात ठेऊन हलक्या हाताने थापून घ्या.वरून तीळ भुरभुरावे व ते हाताने थोडे दाबून घ्यावे..
- 3
कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवा.. त्यात एक स्टॅण्ड ठेवा व त्यावर ताट ठेवा व झाकण ठेवून पंधरा मिनिटे वडी वाफवून घ्या.. नंतर काढून पुर्ण थंड करून घ्या..
- 4
हव्या त्या आकारात वड्या कापून घ्या व कढईत तेल गरम करून मिडीयम गॅसवर वडी सर्व बाजूंनी खरपूस तळून घ्या..
- 5
खमंग खरपूस कोबीची वडी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे..
Similar Recipes
More Recipes


















टिप्पण्या