"खमंग कोबी वडी"

लता धानापुने
लता धानापुने @lata22
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

चाळीस मिनिटे
दोन
  1. दिड कप कोबीचा कीस
  2. 1 टीस्पूनहिरवी मिरची, लसूण, आले जाडसर पेस्ट
  3. 1 टीस्पूनलाल तिखट
  4. 1 टीस्पूनधने पूड
  5. 1 टीस्पूनजिरे पूड
  6. 1 टीस्पूनजिरे
  7. 1 टीस्पूनओवा
  8. 1/2 टीस्पूनहळद आणि हिंग
  9. चवीनुसारमीठ
  10. आवडीनुसार कोथिंबीर
  11. 1 कपबेसन पीठ
  12. 1/4 कपतांदळाचे पीठ
  13. 1 टीस्पूनपांढरे तीळ
  14. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

चाळीस मिनिटे
  1. 1

    कोबी किसून घ्या..एका मोठ्या बाऊल मध्ये किसलेला कोबी घेऊन त्यात आले, लसूण, हिरवी मिरची पेस्ट..लाल तिखट, हळद, हिंग, मीठ, जिरे, ओवा, कोथिंबीर घालून सर्व एकत्र करून घ्या..

  2. 2

    आता बेसन पीठ व तांदळाचे पीठ घालून मिक्स करा.. मीठ घातल्यामुळे कोंबडीला पाणी सुटते त्यातच पीठ भिजले जाते..पाणी लागलेच तर एक टेबलस्पून घ्यावे.. सर्व मिश्रण एकजीव करावे. एक टीस्पून तेल घेऊन परत मळून घ्या व एका ताटाला तेल लावून घ्या..पीठाचा गोळा ताटात ठेऊन हलक्या हाताने थापून घ्या.वरून तीळ भुरभुरावे व ते हाताने थोडे दाबून घ्यावे..

  3. 3

    कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवा.. त्यात एक स्टॅण्ड ठेवा व त्यावर ताट ठेवा व झाकण ठेवून पंधरा मिनिटे वडी वाफवून घ्या.. नंतर काढून पुर्ण थंड करून घ्या..

  4. 4

    हव्या त्या आकारात वड्या कापून घ्या व कढईत तेल गरम करून मिडीयम गॅसवर वडी सर्व बाजूंनी खरपूस तळून घ्या..

  5. 5

    खमंग खरपूस कोबीची वडी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes