कुकिंग सूचना
- 1
अंजीर दोन तास पाण्यात भिजवून नंतर त्याचे तुकडे करावेत व मिक्सरमधून फिरवून घ्यावे त्याचप्रमाणे खजुराच्या बिया काढून त्या सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे
- 2
गॅसवर ठेवून त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून तळून बाजूला ठेवावेत त्याचप्रमाणे भोपळ्याच्या बिया ही जरा परताव्या व त्याही काढून ठेवाव्या
- 3
त्याच कढईमध्ये उरलेलं तूप घालून त्यामध्ये अंजीर व खजूर घालून छान परतावे परतत राहावे व गोळा होईपर्यंत सारखे परतत मिडीयम गॅसवर ठेवावे नंतर गोळा होत आला की त्यामध्ये तळलेले ड्रायफ्रूट्स टाकावे व छान गोळा झाला की ताटलीला तूप लावून त्यावर हे मिश्रण थापावे वरती तळलेल्या भोपळ्याच्या बिया लावाव्यात थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात आपली खजूर अंजीर बर्फी खाण्यासाठी तयार आहे
Top Search in
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17050168










टिप्पण्या