पातोळे (pathole recipe in marathi)

पातोळे (pathole recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सारणासाठी खवलेला नारळ आणि गूळ मंद आचेवर शिजवून घ्या. मिश्रण घट्ट होत आलं की मीठ आणि वेलची पूड घालून मिक्स करा आणि ताटलीत काढून मिश्रण गार करा.
- 2
आवरणासाठी तांदुळाच्या पिठात चिमूटभर मीठ घाला. पाणी घालून सरसरीत पेस्ट बनवा. फार पातळ नको आणि फार घट्ट ही नको. पानावर व्यवस्थित पणे सारवता आली पाहिजे.
- 3
हळदीची पानं धुवून पुसून घ्या. मोठी पानं असतील तर एका पानाचे दोन तुकडे करा (लांब बाजू कापा). प्रत्येक पानाला थोडं तूप लावून घ्या.
- 4
थोडी तांदुळाची पेस्ट हळदीच्या पानावर एकसारखी पसरा. पानाची शीर मधे आली पाहिजे. दोन्ही बाजूला एक सारखं पीठ लागलं पाहिजे.
- 5
आता थापलेल्या / सारवलेल्या पिठावर शीरेच्या एका बाजूला सारण पसरवा. अगदी कडेपर्यंत पसरू नका.
- 6
पानाच्या शीरेवर पानाची घडी घाला म्हणजे सारणाच्या दोन्ही बाजूला पिठाचं आवरण येईल. कडा हलक्या हातानं दाबून बंद करा.
- 7
सगळी पाने अशी तयार करून घ्या.
- 8
ईडली / मोदक पात्रात पाणी गरम करून त्यातल्या जाळीवर ही पाने लावा. झाकण बंद करून १५ मिनिटं वाफवून घ्या. शिजलेले पातोळे पानाला चिकटत नाहीत.
- 9
गरमागरम पातोळे साजूक तुपाबरोबर खायला द्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes




टिप्पण्या