Crispy and Juicy Colorful Chirote
# क्रिसमस बेक अँड स्वीट#Team Trees
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम परात मध्ये मैदा, रवा,चुटकीभर मीठ आणि मोहनासाठी दोन चमचे वनस्पती घी घालून दुधाने घट्ट पीठ मळून घ्या. मळलेल्या पिठाचे चार समान भाग करून घ्या आणि एक पांढरा गोळा वेगळा ठेवून दुसरे तीन गोळे हिरवा, पिवळा, लाल रंग घालुन कलर चे पीठ मळून घ्या.
- 2
हे मळलेले पीठ पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवून द्या. तोपर्यंत साठा बनवून ज्यादा. साठा बनवण्यासाठी कॉर्नफ्लॉवर आणि कस्टर्ड पावडर मध्ये तीन चमचे घी घालून मऊ पेस्ट बनवून घ्या. पंधरा ते वीस मिनिटानंतर सर्व कलरचे पिठाचे समान आकाराच्या पोळ्या लाटून घ्या.
- 3
सर्व पोळ्या लाटून झाल्यानंतर एक पांढरी पोळी घ्या त्यावर चांगल्या प्रकारे साठा पसरून घ्या, नंतर त्यावर लाल रंगाची पोळी ठेवा आणि साठा पसरून घ्या. असे करत करत सर्व पोळ्या एकावर एक ठेवून त्यावर साठा लावत जा आणि सर्वात वरती पांढरी ची पोळी ठेवा. आता या सर्वांना एक सोबत रोल करून घ्या. या रोडला थोडेसे लांब करत ओढा. आणि त्याचे लहान लहान पोळी लाटण्यासाठी तुकडे कापा.
- 4
गॅस वर कढई ठेवून त्यामध्ये एक कप साखर आणि अर्धा कप पाणी टाकून साखरेचा पाक बनवून घ्या. आता कापलेले तुकड्याचे पुऱ्या लाटून घ्या. आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक करून टाका आणि त्या तळून घ्या.
- 5
सर्व चिरोटे तळून झाल्यानंतर त्याला साखरेच्या पाकात टाका. आणि त्याला एक दोन मिनिटानंतर लगेच काढून घ्या. आता तयार आहे तुमचे
Keywords
Similar Recipes
More Recipes

















टिप्पण्या