शेवपूरी (sev puri recipe in marathi)
#स्ट्रीट
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र आणून ठेवायचं.
- 2
थोडीशी कोथिंबीर, लाल मिरची, हिरवी मिरची चांगली धुवून त्यात लसूण टाकायचे आणि मिक्सरमध्ये चांगली पेस्ट करून घ्यायची.
- 3
गूळ आदल्या दिवशी बारीक किसून पाण्यात उमलत ठेवायचं तसेच खजूर सुद्धा एका भाड्यात पाणी घालून भिजत ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी गूळ एक पातेल्यात घेऊन चांगला उखळवू द्यायचा मग त्यात दालचिनी चे दोन बारीक तुकडे करून टाकायचे मग पुन्हा उखळ आली की त्यात खजूर मिक्सरला लावून घेऊन त्यात टाकायचे एक चांगला कड आला की गॅस काढून टाकायचा.
- 4
सर्व प्रथम पुऱ्या मांडून घेऊ,त्यात थोडा थोडा बटाटा लावून मग त्यात कांदा, मग टोमॅटो मग लाल तिखट चटणी मग गोड चटणी मग सगळे मसाले चिमूटभर मीठ, काळ मीठ, पाणीपुरी मसाला टाकून त्यावर बारीक शेव, जाडी शेव स्प्रेड करू.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12257911











टिप्पण्या