साबुदाणा वडा आणि पन्हे

#आई
आईला तशी उपवास वगैरे ची काही हौस नाहीच. उगीच पित्त होणाऱ्या सवयींपासून ती लांबच. त्यामुळे काय करायची ती पूजा - नामस्मरण मनोभावे करा. उपवास वगैरे करून शरीराला त्रास नको. त्यातच बाईला संपूर्ण घराची काळजी घ्यावी लागते, म्हणजे आपली तब्येत सांभाळून राहावं ही तिची विचारसरणी... पण हो साबुदाणा खिचडी, वडे, बटाट्याची फराळी भाजी, मुगाची उपवासाची खिचडी हे सगळे तिचे हातखंडे. आणि माझ्या नवऱ्याची आई (आता माझी पण) त्यांची खासियत कैरीचे पन्हे म्हणून ते ही केले. म्हणून आजची ही साबुदाणा वडे आणि कैरिपन्हे रेसिपी खास दोघींना समर्पित... आई तुझ्यासाठी😘😘

कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा वडे: साबुदाणे ४-५ तास भिजत ठेवावे. उकडेले बटाटे कुस्करून घ्या. शेंगदाणे जाडसर वाटून घ्या. मिरच्या बारीक चिरून घ्या.
- 2
वरील जिन्नस एका मोठ्या भांड्यात एकत्र घेऊन त्यात जिरे, मीठ, कोथिंबीर,कढीपत्ता टाकून नीट मिक्स करा. मग मिश्रणाचे चपटे गोळे (वडे) करा.
- 3
हे वडे गरम तेलात चांगले बदामी रंग येईपर्यंत तळून घ्या. चटणी, दही, सॉस बरोबर सर्व्ह करा.
- 4
आम पन्हे: ३ कैऱ्या उकडून घ्या. त्याचा गर काढून मिक्सरला वाटून घ्या. एका भांड्यात गरम पाण्यात गुळ वितळवून कैर्यांच्या गरात टाका. वेलची पूड,, मीठ आणि हवे तितके पाणी घालून पन्हे तयार. बर्फ घालून सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या