बटाटा वडा (BATATVADA RECIPE IN MARATHI)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

#आई
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.आई मध्ये सार जग सामावलेले आहे,लग्न होण्या आधी आई शिवाय एक पानं ही हालत नव्हतं,आई समोर असली कि बस दुसरं कशाची ही गरज नाही, माझ्यासाठी दिवस रात्र सतत काळजी करणाऱ्या आई ला माझा विनंम्र अभिवादन🙏 म्हणून मी आज माझ्या आई चे आवडते बटाटे वडे ची पाककृती पोस्ट करत आहे तर पाहूया बटाटे वडे ची पाककृती.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 6-7मध्यम आकाराचे उखडून मॅश केलेले बटाटे
  2. 1 इंचअद्रक
  3. 2-3लसूण पाकळ्या
  4. 1 टीस्पूनजीरा
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. 1/2 टीस्पूनहिंग
  7. 1 टीस्पूनधने आणि बडीसोप ची खडबडीत पूड
  8. कोथिंबीर
  9. चवीनुसारमीठ
  10. 250 तेल तळण्यासाठी
  11. 1 कपबेसन
  12. 1/2 टीस्पूनहळद
  13. चवीनुसारमीठ
  14. चिमूटभरखायचा सोडा
  15. 1 टेबलस्पूनतांदळा च पीठ
  16. आवश्यकते नुसारपाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी एका भांड्यात बेसन,तांदळाचे पीठ, मीठ, हळद, पाणी घालून दाटसर मिश्रण बनवून घ्यावं.

  2. 2

    आता मिक्सर च्या भांड्यात अद्रक, लसूण, जीरा,मिरची,कोथिंबीर घालून खडबडीत वाटून घ्यावं.

  3. 3

    आता एका कढईत तेल गरम करून त्यात वाटलेले वाटण घालून परतून घ्यावं, मग त्यात हिंग, हळद,धने बडीसोप ची पूड, मॅश केलेले बटाटे आणि मीठ घालून छान मिक्स करून गॅस बंद करावे आणि ह्या मिश्रणाचे गोल आकारचे वडे बनवून घ्यावे.

  4. 4

    आता बेसन च्या पिठात खायचं सोडा घालून मिक्स करावे आणि 1 टिबलस्पून गरम तेल घालून मिक्स करावे, मग त्यात बटाट्याचे वडे घोळवून गरम तेलात तळून घ्यावे.

  5. 5

    गरमा गरम बटाटे वडे तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

Similar Recipes