मोरंबा (MORABA RECIPE IN MARATHI)

#mango #amba #mango_love #मोरंबा #आंबा
उन्हाळा म्हणजे साठवणीचा काळ... पापड, कुरडया,लोणची, मोरांबे इतकंच काय अगदी वर्षभर साठवून ठेवायचे हळद, मसाले, चिंच, आमसुले, सरबत हे सारे बेगमीचे पदार्थ सुकवून भरून ठेवण्याचा हक्काचा महिना. अशाच एका बेगमीच्या पदार्थाची पाककृती आज मी देत आहे. मोरंबा... जॅम जेली च्या या युगात पारंपरिक मुरंबा अजूनही आपला गोडवा टिकवून आहे. बनवायला अगदी सोप्पा असा पदार्थ नक्की बनवा यावर्षी lockdown मध्ये...
यात साखरे ऐवजी तुम्ही गुळही घालू शकता. हे प्रमाण आंब्याच्या आंबट पणा नुसार कमी जास्त करू शकता. शक्यतो तोतापुरी कैऱ्या घ्या म्हणजे त्यात कमी साखर (प्रमाण १:१ किलो) लागते.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम कैऱ्या स्वच्छ धुवून, पुसून, किसून घ्या.
- 2
त्यात साखर घालून अर्धा तास झाकून ठेवा म्हणजे साखर वितळून चांगली मुरेल.
- 3
जाड बुडाच्या भांड्यात हे मिश्रण गॅस वर ठेवून ५ मिनिटे झाकून शिजवा, आणि मग झाकण काढून एक तरी पाक होई पर्यंत शिजवत रहा.
- 4
त्यात लवंग आणि वेलची पूड घालून मुरंबा थंड होऊ द्या आणि बरणीत भरून ठेवा.
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या