चण्याच्या दाळीचा ढोकला (DHOKLA RECIPE IN MARATHI)
#स्टीम
कुकिंग सूचना
- 1
चणा डाळ 2 तास भिजवून ठेवावी, भिजलेली चणा डाळ मिक्सर मधून काढावी त्यात हिरवी मिरची, लसूण घालून वाटून घ्यावे।
- 2
मग हे मिश्रण एका भांड्यात काढावे त्या मध्ये ताक व बेसन घालावे। त्यात 2 टीस्पून तेल, 2 टीस्पून साखर आणि 2 टिसपून मीठ घालून मिक्स करावे आणि ते मिश्रण 3-4 तास झाकून ठेवावे ।
- 3
4 तास नंतर एका वाटीत 2टेबलस्पून पाणी आणि त्यात 1/4 टीस्पून citric acid विरघळवून घ्यावे। भांड्यातील मिश्रणावर 1 चमचा सोडा घालून हे पाणी सोडावे । त्या वर फेस येईल लगेचच ते मिश्रण एकाच दिशेने फेटावे।
- 4
फेटून थोडं फुगेल मग थाळी ला तेल लावून हे मिश्रण त्यात ओतावे आणि लगेच वाफवावे 15-20 मिनिटं । 20 मिनिटांनी सूरी घालून बघावे सूरी ला चिपकत नसेल तर झाले अशे समजावे।
- 5
फोडणी साठी तेल गरम करावे त्यात मोहरी, हिंग, तिळ, कढीपत्ता आणि मिरची चे तुकडे घालावे आणि फोडणी त्या वर ओतावी । वड्या पडून गरमा - गरमा सर्व्ह करावा 'ढोकला' ।
Keywords
Similar Recipes
More Recipes










टिप्पण्या