नारळाच्या वडया (चुनकाप)

#श्रावण
हा पदार्थ पारंपारीक व सर्वांच्या घरी बनणारा आहे,काही जण याला नारळी पाक म्हणतात.. आमच्या कोकणात याला नारळ ची चुनकाप म्हणतात,कोकणात पाहुणा आला की निघताना त्याला भेट म्हणून हीच चुनकापे देतात. आता श्रावण सुरु झालाय,घरोघरी अशा वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल ही चालू झालीय... मी सुद्धा या श्रावणाची सुरवात करतेय,सर्वांच्या आवडीच्या चुनकापा नेच...

कुकिंग निर्देश
- 1
जाड बुडाच्या टोपात खोबरे,साखर व दूध घालुन मध्यम गॅस वर 5-7 मिनीट ठेवायचे नंतर गॅस मंद करून बटाटा घालुन सर्व एकजीव करून 4-5 मिनीट परतायचे गोळा होईल (तूप मी नाही घातले,खोबरयात तेल असतेच)
- 2
तूप लावलेल्या डिश वर हा गोळा ठेऊन तूप लावलेल्या वाटीने पसरायचे.बटाटा घातल्याने नुसते खोबरे लागत नाही अगदी बर्फी सारखे मउ टेक्सचर येते.
आवडी प्रमाणे वडया पाडाव्यात व सूखा मेवा ने सजावट करावी.
समान रेसिपी
और रेसिपीज़

कमैंट्स (8)