चिकन मंचाव नूडल्स सूप (chicken manchow noodles soup recipe inmarathi)

#सूप
चिकन मंचाव सूप हे माझे सर्वात आवडते सूप आहे. आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेलो की माझी पहिली फरमाईश हीच असते. चला तर मग बघुया याची रेसिपी... 🙏🏻😊
चिकन मंचाव नूडल्स सूप (chicken manchow noodles soup recipe inmarathi)
#सूप
चिकन मंचाव सूप हे माझे सर्वात आवडते सूप आहे. आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेलो की माझी पहिली फरमाईश हीच असते. चला तर मग बघुया याची रेसिपी... 🙏🏻😊
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी चिकन स्वच्छ धुवुन घ्यायचे आणि चार ग्लास पाणी गरम करायला ठेवावे. त्यात चवीप्रमाणे मीठ टाकून आणि चिकनचे तुकडे टाकून बारीक गॅसवर शिजवून घ्यायचे. साधारण 20 ते 25 मिनिटे लागतात. म्हणजे चांगला चिकन स्टॉक तयार होतो. चिकन शिजल्यावर त्यातील चिकन बाहेर काढून कुस्करुन घ्यायचे. चिकन शिजेपर्यंत सगळ्या भाज्या चिरुन घ्यायच्या.
- 2
एकीकडे चिकन शिजायला ठेवल्यावर दुसरीकडे नूडल्स पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे. थोडे तेल टाकायचे म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाहीत. नूडल्स शिजवून झाल्यानंतर एका चाळणीत घेऊन त्यावर गार पाणी सोडायचे म्हणजे ते पुढे जास्त शिजणार नाहीत. थंड झाल्यावर यातले अर्धे नूडल्स बाजूला काढून ठेवायचे सूप मध्ये घालण्यासाठी. बाकीच्या नुडल्स वर एक टेबलस्पून कॉर्नफ्लोअर भुरभुरून घ्यायचे आणि हे नूडल्स तेलात तळून घ्यायचे.
- 3
आता एका वाटीत थोडे पाणी घेऊन त्यात दोन टेबलस्पून कॉर्नस्टार्च घालून स्लरी करून घ्यायची. अंडे पण फेटून ठेवायचे.
- 4
आता गॅसवर एक पातेले ठेवून त्यात दोन टेबलस्पून तेल गरम करायचे. तेल गरम झाल्यावर त्यात आले-लसूण घालून एक मिनिट परतायचे. मग त्यात हिरवी मिरची आणि बारीक चिरलेल्या भाज्या घालून पाच ते सात मिनिटे परतायचे. आता चिकनचा स्टॉक घालायचा. एक उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यावर त्यात सोया सॉस, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर, मीठ आणि साखर घालून चांगले मिक्स करायचे.
- 5
आता पाच मिनिटे उकळी येऊ द्यायची. मग त्यात चिकन आणि नूडल्स घालून मिक्स करायचे. मग फेटलेले अंडे हळूहळू घालून हलवायचे. आता जरा टेस्ट करून बघायचे. काही कमी जास्त असले तर ऍडजेस्ट करायचे. पाच मिनिटे उकळल्यानंतर त्यात कॉर्न स्टार्चची स्लरी घालायची. पुन्हा पाच मिनिटे चांगले उकळायचे आणि गॅस बंद करायचा.
- 6
तयार आहे आपले गरमागरम चिकन मंचाव नूडल्स सूप... 😍😍 सर्व्ह करताना वर तळलेले नूडल्स घालून गरमागरम सर्व्ह करायचे... 😋😋
Keywords
Similar Recipes
More Recipes
















टिप्पण्या (2)