पुरणाची दिंडे आणि कडबू (purnache dinde ani kadbu recipe in marathi)

#shravanqueen
#रेसिपीबुक #week7
#रेसिपी 1 #सात्विक
Supriya Vartak Mohite ताईंनी खूप छान अशी पारंपारिक रेसिपी शिकवली आहे. आमच्याकडे याला पुरणिचे कडबू म्हणतात आणि ते तेलात तळून घेतात. मी दोन्ही पद्धतीचे बनवले आहेत. जेणेकरून तुम्हालाही समजेल
चला तर मग बघुया रेसिपी... 👍🏻😁
पुरणाची दिंडे आणि कडबू (purnache dinde ani kadbu recipe in marathi)
#shravanqueen
#रेसिपीबुक #week7
#रेसिपी 1 #सात्विक
Supriya Vartak Mohite ताईंनी खूप छान अशी पारंपारिक रेसिपी शिकवली आहे. आमच्याकडे याला पुरणिचे कडबू म्हणतात आणि ते तेलात तळून घेतात. मी दोन्ही पद्धतीचे बनवले आहेत. जेणेकरून तुम्हालाही समजेल
चला तर मग बघुया रेसिपी... 👍🏻😁
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी डाळ स्वच्छ धुऊन घ्यायची. कुकरमध्ये डाळ, तीन ग्लास पाणी आणि हळद घालून शिजवायची आहे. पहिली शिट्टी होईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा. नंतर बारिक करून 20 ते 25 मिनिटे शिजवायचे आहे.
- 2
डाळ शिजून होईपर्यंत इकडे कणिक मळून घ्यायची आहे. त्यासाठी मैदा आणि गव्हाच्या पिठात चवीप्रमाणे मीठ आणि गार झालेले कडवलेले तेल घालून पिठाला चोळून घ्यायचे. मग हळूहळू थोडे थोडे पाणी घालून घट्ट कणिक मळून घ्यायची आणि त्याचे तीन भाग करायचे. एका भागात लाल रंग दुसऱ्या भागात हिरवा रंग आणि तिसऱ्या भागात निळा रंग घालून मिक्स करून तीन गोळे बनवून ठेवायचे आणि झाकून ठेवायचं.
- 3
आता शिजलेली डाळ थंड झाल्यानंतर चाळणी मध्ये गाळून घेऊन येळवणी वेगळी काढून ठेवायची. आता डाळ एका पातेल्यात घेऊन त्यात गूळ घालून पुरण करायला ठेवायचे.थोड्या वेळाने पुरण पातळण होते. तेव्हा त्याला घटलून घ्यायचे. हळूहळू पुरण घट्ट होऊ लागते तेव्हा त्यात वेलची आणि जायफळ पूड घालायची आणि आणखी थोडा वेळ ठेवून गॅस बंद करायचा.
- 4
थंड झाल्यावर पुरण आणखी घट्ट होते. मी एकदम बारीक पुरण केलेले नाही. आमच्याकडे कडबू साठी पुरण करतात ते पोळी सारखे बारीक नसते. थोडे जाडसर असते.
- 5
आता दिंडे आणि कडबू करण्यासाठी प्रत्येक कलरचे दोन दोन गोळे करून घ्यायचे. त्यातील एक हिरव्या रंगाचा गोळा घेऊन त्याची मोठी पोळी लाटायची आणि वाटीने गोल कट करून घ्यायचे. दोन पोळ्यांचे 14 गोल होतात त्याप्रमाणे त्याचे सात दिंडे किंवा कडबू करता येतात. आता त्यातील एका पातीवर मधोमध पुरण ठेवायचे आणि त्यावर दुसरे पान ठेवायचे. सगळीकडून कडा बंद करून घ्यायच्या आणि फोटोत दाखवल्याप्रमाणे डिझाईन करून घ्यायचे किंवा तुम्हाला जे आवडेल त्याप्रमाणे डिझाईन करू शकता.
- 6
दिंडे वाफवून घेण्यासाठी एका चाळणीला तेल लावून घेतले. यावर तयार केलेले हे दिंडे ठेवायचे. एका कढईमध्ये ठेवायचे आणि त्यावर दिंडे ठेवलेली चाळणी ठेवायची आणि त्यावर झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिटे वाफवून घ्या. यातले मी थोडे दिंडे बनवले आहेत आणि थोडे कडबू बनवले आहेत. कडबूसाठी एका कढईमध्ये तेल गरम करायचे आणि मध्यम आचेवर कडबू तळून घ्यायचे.
- 7
तयार आहेत गरमागरम दिंडे आणि कडबू... 😍😍😋😋
Keywords
Similar Recipes
More Recipes

















टिप्पण्या